कोरोना काळात 4 या पॉलिसी असणं अत्यंत आवश्यक, संकटकाळात ठरतील फायदेशीर

कोरोना काळात 4 या पॉलिसी असणं अत्यंत आवश्यक, संकटकाळात ठरतील फायदेशीर

कोरोनाकाळात (Coronavirus) आरोग्याविषयी जोखीम निर्माण झाली आहे. त्याच्याशी सामना करण्यासाठी काही विमा कव्हर आवश्यक आहेत. ज्याअंतर्गत COVID-19 काळात मदत मिळू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : जगभरात आतापर्यंत विविध साथीचे रोग आले आहे. प्लेगपासून 2013 मध्ये आलेल्या इबोलाने सर्वांना हैराण केले होते. या दरम्यान आलेल्या आर्थिक, सामाजिक सर्वच संकटांचा मानवजातीने सामना केला आहे. 2020 हे जवळपास संपूर्ण वर्ष कोरोनाशी (Coronavirus) लढा देण्यातच संपण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये देखील आपल्याला कोरोनाचा सामना करावा लागेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या काळात काही आर्थिक जोखीम प्रत्येकाला स्विकारावी लागली. भविष्यात अशी जोखीम पत्करावी लागू नये याकरता आपण तयार असणं गरजेचं आहे. आर्थिक बाजू सावरून धरण्यासाठी विमा हा उत्तम पर्याय आहे. समोर आलेल्या जोखिमेचा सामना करण्यासाठी काही विमा कव्हरबाबत माहिती जाणून घेऊया

आरोग्य विमा (Health Insurance)

पँडेमिक काळात तुमचे आरोग्य धोक्यात आहे. 100 टक्के कुणालाच खात्री नाही आहे की, तुम्ही यामुळे प्रभावित होणार नाही. आरोग्यासंबंधित विविध प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी किंवा संक्रमण काळात मदतीसाठी आरोग्य विमा गरजेचा आहे. जर बेस पॉलिसी लिमिट संपत असेल तर पाच लाखापर्यंतची वैयक्तित पॉलिसी काढू शकता. आरोग्य विमा आवश्यक आहे, कारण तुम्हा एक योग्य कव्हर मिळतो जरी पँडेमिक असेल किंवा नसेल.

(हे वाचा-10 वर्षात दुप्पट होतील तुमचे पैसे, फायद्याची आहे ही पोस्ट ऑफिस योजना)

सायबर विमा (Cyber Insurance)

कोरोना काळात आपण सर्वांनीच Work From Home ची प्रक्रिया आत्मसात केली आहे. यादरम्यान आपला वेळ तर वाचतोय पण सायबर क्राइमचा धोका वाढला आहे. ऑफिसच्या तुलनेत घरातील यंत्रणेमध्ये कमी सुरक्षा असते, परिणामी इमेल हॅकिंग, फिशिंग या घटना वाढल्या आहेत. इंडियन कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमवने यावर्षी ऑगस्टमध्ये 7 लाख सायबर हल्ल्याच्या रिपोर्टची नोंद केली आहे, गेल्यावर्षी हा आकडा 4 लाख होता. अशावेळी केवळ कंपन्याच नाही तर वैयक्तिक स्तरावर देखील सायबर विमा घेणे आवश्यक आहे.

(हे वाचा-ऑनलाइन बर्गर पडला महागात! 178 रुपयांची ऑर्डर अन् खात्यातून गेले 21,865 रुपये)

मोटार विमा (Motor Insurance)

सध्याच्या काळात सार्वजनिक वाहतुकींच्या सेवांऐवजी खाजगी वाहनांचा वापर वाढला आहे. अशावेळी कोणत्याही आकस्मिक नुकसानाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. लॉकडाऊन काळात जरी वाहनांचा फार वापर झाला नसला तरीही मशिनमध्ये बिघाड हा होऊच शकतो. तुमचे वाहन जरी पार्किंगमध्ये उभे असेल तरीही मोटर इन्शूरन्स आवश्यक आहे.

(हे वाचा-EPFO अंतर्गत या दोन महत्त्वाच्या योजना आणण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू)

घराचा विमा (Home Insurance)

गेल्या काही काळापासून तुम्ही घरातून काम करत असाल, त्यामुळे घरात चोरी किंवा अन्य नुकसानाची शक्यता वाढली आहे. त्याचप्रमाणे आधीपेक्षा आता घरातील संसाधनांचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे आग, शॉर्ट सर्किट या दुर्घटनांमुळे घराचे नुकसान होऊ शकते. छोटेशा नुकसानामुळे देखील खिशाला चाप बसू शकतो. अशावेळी घराचा विमा काढलेला असणे आवश्यक आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 31, 2020, 11:03 AM IST

ताज्या बातम्या