'या' गोष्टी आजपासून होणार 'स्वस्त', कुठल्या व्यवहारांमध्ये वाचणार पैसे?

1 ऑगस्टपासून बँकांचे काही व्यवहार फ्री होणार आहेत. शिवाय सरकारच्या नव्या घोषणांमुळे या काही वस्तू स्वस्त होणार आहेत.. पाहा सविस्तर...

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 09:07 AM IST

'या' गोष्टी आजपासून होणार 'स्वस्त', कुठल्या व्यवहारांमध्ये वाचणार पैसे?

मुंबई, 1 ऑगस्ट : सर्वसामान्यांसाठी ऑगस्ट महिना खूप आनंद घेऊन येत आहे. 1 ऑगस्टपासून बऱ्याच गोष्टी स्वस्त होत आहेत. अनेक आर्थिक व्यवहार फ्री होतायत, तशा इलेक्ट्रिक कार्स आणि बाइक्स खरेदी करणंही स्वस्त होत आहे. शिवाय घर खरेदी करणंही स्वस्त होत आहे. जाणून घेऊ त्याबद्दल -

इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त

1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं स्वस्त होणार आहे. जीएसटी काउन्सिलनं बॅटरीवर चालणाऱ्या कार आणि बाइकवर लागणारा GST कमी केला आहे. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत हे दर कमी केले. इलेक्ट्रिक व्हेइकलवर जीएसटीचे दर 12 टक्क्यांहून कमी होऊन 5 टक्के झाले आहेत. या निर्णयामुळे कार खरेदी करणं 70 हजार रुपयापर्यंत स्वस्त झालं आहे. तर चार्जरवरचा जीएसटी 18 टक्क्यांहून कमी होऊन 12 टक्के झाला आहे.

(इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी)

1 ऑगस्टनंतर इलेक्ट्राॅनिक कारवरचा जीएसटी कमी झाला आहे. तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत इलेक्ट्रिक कार खरेदी करत असाल, तर 1 ऑगस्टनंतर तुमचे 70 हजार रुपये वाचतील. समजा तुम्ही 1 लाख रुपयांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करत असाल तर 7 हजार रुपये कमी खर्च येईल.

Loading...

(रोज करा 40 रुपयांची बचत आणि 'अशा' प्रकारे मिळवा 8 लाख)

SBI नं मोफत दिल्या या सेवा

स्टेट बँक ऑफ इंडियानं आयएमपीएस दर काढून टाकलेत. आता तुम्ही SBIचा योनो अॅप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे फंड ट्रान्सफर करणार असाल तर तुम्हाला कसलाच दर पडणार नाही. बँकेनं आधीच आरटीजीएस आणि एनईएफटी दर रद्द केले होते. आता IMPS दर रद्द केल्यानं SBIच्या ग्राहकांना ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शन करणं सोपं जाईल.

घर घेणं झालं स्वस्त

तुम्ही दिल्लीत राहात असाल तर नोएडा आणि ग्रेट नोएडा इथे घर खरेदी करणं किंवा दुकान घेणं स्वस्त झालं आहे. या नव्या निर्णयामुळे ग्रुप हाउसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज रद्द केला आहे.

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...