नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! 2019 मध्ये इतका पगार वाढणार

यंदाही पगारवाढ देण्यात आशियाई देशांमध्ये भारत आघाडीवर

  • Share this:

नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांनी सरासरी 9.7 टक्के पगारवाढ मिळू शकतो. याबाबतचा अंदाज एचआर कन्सल्टन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

यंदा उत्पादनांच्य़ा देशांतर्गत मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा कंपन्यांना आहे. याशिवाय महागाई दर कमी झाल्याचा फायदा नोकरी करणाऱ्यांना होणार आहे.  मागच्या वर्षी 9.5 टक्के पगारवाढीची अपेक्षा होती.

आशियाई देशांमध्ये यंदाही भारतच पगारवाढीच्या दरात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताशिवाय रशियात 7.2 टक्के तर दक्षिण आफ्रिकेत 6.7 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

ब्राझीलमध्ये 5.8 टक्के, अमेरिकेत 3.1 टक्के, ऑस्ट्रेलियात 3 टक्के तर ब्रिटनमध्ये 2.9 टक्के पगारवाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. चांगले काम करणाऱ्यांना ही वाढ 15.6 टक्के इतकी मिळण्याची शक्यता आहे.

नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाणही यंदा कमी झाले आहे. 2014-15 मध्ये हे प्रमाण 18.1 टक्के होते तर यावर्षी ते 15.8 टक्के आहे.

ई कॉमर्स आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रात 11.1 टक्के तर लाइफ सायन्स, अॅटोमोबाईल आणि कन्झ्युमर प्रॉडक्टमध्ये काम करणाऱ्यांच्या पगारात 10.1 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

याशिवाय हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन क्षेत्रात 9.5 टक्के तर लॉजिस्टिक्समध्ये 8.2 टक्के पगारवाढ होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2019 11:39 AM IST

ताज्या बातम्या