टोलसाठी आता नाही थांबावं लागणार रांगेत, गडकरींनी केली फास्टॅगची घोषणा

टोलसाठी आता नाही थांबावं लागणार रांगेत, गडकरींनी केली फास्टॅगची घोषणा

सध्या टोल नाक्यांवर टोलवसुलीमुळे बराच काळ रांगेत थांबावं लागतं. पण या सुविधेमुळे महामार्गांवर रांगेत थांबावं लागणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : टोलचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टोल नाक्यांवर टोलवसुलीमुळे बराच काळ रांगेत थांबावं लागतं. पण आता मात्र सगळ्या महामार्गांवर रांगेत थांबावं लागणार नाही. 1 डिसेंबर 2019 पासून टोल नाक्यांवरच्या लेन फास्टॅगशी जोडल्या जाणार आहेत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं.

सध्या हा फास्टॅग मोफत लावला जातोय पण त्याची किंमत 150 रुपये आहे. हे पैसे सरकार देतंय. देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर एकूण 527 टोल नाके आहेत. त्यापैकी 380 टोल नाके फास्टॅगशी जोडले गेलेत.

FASTag नेमकं आहे काय?

FASTag ही वाहनांसाठी एक प्रिपेड टॅग सुविधा आहे. यामुळे तुम्ही न थांबता आणि वेळ वाया न घालवता गाडी चालवू शकता. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा उपयोग होतो.

एकदा तुमचा FASTag अॅक्टिव्ह झाला की तो तुम्ही गाडीच्या काचेवर लावू शकता. टोल नाक्यावर पोहोचलं की तुमच्या अकाउंटमधून टोलचे पैसे कापले जातील. यासाठी तुमचं बँक अकाउंट नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या पेमेंट वॉलेटशी लिंक झालेलं असेल.

Loading...

(हेही वाचा : Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, या छोट्याशा चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं)

1 डिसेंबरनंतर फास्टॅगसाठी पैसे द्यावे लागतील. 537 टोलनाक्यांपैकी 17 टोलनाके सोडून सगळ्या टोल नाक्यांवर फॅस्टॅग असेल. जे 17 टोलनाके नवे आहेत तिथे मात्र ही सुविधा नसेल.

फास्टॅगबद्दलची सगळी माहिती Fastag Toll Free Number वर मिळू शकेल. हा नंबर आहे, 1033. दिल्लीमध्ये 50 पेट्रोल पंपांवर फास्टॅग उपलब्ध आहे. फास्टॅग GST ला जोडण्याचीही योजना आहे, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

कुठे मिळेल फास्टॅग?

नवी गाडी खरेदी करताना डीलरकडून फास्टॅग मिळू शकेल. जुन्या वाहनांसाठी नॅशनल हायवे पॉइंट ऑफ सेलमधून फास्टॅग खरेदी करता येईल. याशिवाय खाजगी बँकांमधून फास्टॅग मिळू शकेल. कोणत्याही सरकारी बँकेतून फास्टॅग स्टिकर ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करून मागवता येईल.

=====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...