'वॉलमार्ट इंडिया' आर्थिक अडचणीत, टॉप 100 अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

'वॉलमार्ट इंडिया' आर्थिक अडचणीत, टॉप 100 अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

ओयो रुम्स नंतर आता तोट्यात सुरू असलेली वॉलमार्ट इंडिया कंपनी मोठं पाऊल उचण्याची शक्यता आहे. कंपनीतील टॉप पोस्टवर काम करणाऱ्या 100 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची नोकरी संकटात आली आहे. लवकरच कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,13 जानेवारी: आर्थिक संकटात सापडलेल्या विदेशी कंपनी 'ओयो रुम्स'नं मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. आता वॉलमार्ट इंडिया कंपनीही तोट्यात आहे. त्यामुळं कंपनीनं 100 पेक्षा अधिक टॉप पोस्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कंपनीतील स्टोअर्स व्यावसायाशी निगडीत असलेल्या वरिष्ठ एक्झिक्युटिव्हला कामावरून कमी करण्यात येणार आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार कंपनी गुरुग्राममधील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत आहे. सोर्सिंग, ऍग्री व्यावसाय आणि FMCG विभागातील व्हाईस प्रेसिडेंडसहित 100 वरिष्ठ एक्झिक्युटिव्हला कामावरून कमी करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉलमार्टच्या एका टाऊनहॉलमध्ये याची घोषणा केली आहे.

टॉप अधिकाऱ्यांची नोकरी संकटात

कंपनी आर्थिक संकटात असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात येणार आहे. त्यामुळं कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कधी काय होईल याची भीती कर्मचाऱ्यांना सतावते आहे. मिळालेल्या माहिती नुसार कंपनीला कॅश आणि कॅरी व्यावसायात भविष्य दिसत नाही. त्यामुळं कंपनीनं कर्मचारी कमी करून हा व्यावसायत विकण्याचे संकेत दिले आहे. येवढचं नाही तर फ्लिपकार्डसोबत व्यावसाय कऱण्याचे संकेतही यातून मिळत असल्याचं दिसतंय. येवढचं नाही तर मुंबईतील फुलफिलमेंट सेंटरही वॉलमार्ट कंपनी बंद करण्याच्या तयारीत आहे. येवढचं नाही तर वॉलमार्ट कंपनी भारतात आणखी जास्त स्टोअर्स उघडणार नसल्याची माहिती आहे.

एप्रिल महिन्यात पुन्हा कर्मचारी कपात

वॉलमार्ट कंपनीला भारतात नफा मिळत नाही. त्यामुळं कंपनी तोट्यात सुरू आहे. कंपनी या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण दिसतंय.वॉलमार्ट

कंपनी विक्रीचे संकेत

तोट्यात सुरू असलेल्या वॉलमार्ट इंडिया कंपनी विकण्याचे संकेत मिळताहेत. काही महिन्यांपूर्वी टाटा ग्रुपनं वॉलमार्ट कंपनीचे भारतातील सर्व हॉलसेल व्यावसाय खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. टाटा आणि वॉलमार्ट कंपनीत तशी बोलणीही झाली असल्याची माहिती आहे. मात्र टाटा कंपनीला वॉलमार्टचा व्यावसाय खरेदी करण योग्य वाटलं नाही. त्यामुळं त्यांनी व्यावसाय खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. वॉलमार्ड इंडियाच्या बेस्ट प्राईस स्टोअरमध्ये मार्च 2019 पर्यंत 2 हजार 180 कोटी रुपये तोट्यात होती. मागील आर्थिक वर्षात वॉलमार्ट इंडियाची विक्री 4 हजार 95 कोटी होती तर तोटा 171.6 कोटी होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 01:31 PM IST

ताज्या बातम्या