मराठी बातम्या /बातम्या /मनी /Work From Home बाबत सरकार घेणार मोठा निर्णय; एप्रिलपासून बदलणार ऑफिसमधील चित्र

Work From Home बाबत सरकार घेणार मोठा निर्णय; एप्रिलपासून बदलणार ऑफिसमधील चित्र

कोरोना व्हायरसच्या (COVID-19) महासाथीमुळे ऑफिसातील वर्क कल्चरमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. येत्या काळात यात अधिक बदल होण्याची शक्यता आहे

कोरोना व्हायरसच्या (COVID-19) महासाथीमुळे ऑफिसातील वर्क कल्चरमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. येत्या काळात यात अधिक बदल होण्याची शक्यता आहे

कोरोना व्हायरसच्या (COVID-19) महासाथीमुळे ऑफिसातील वर्क कल्चरमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. येत्या काळात यात अधिक बदल होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली, 2 जानेवारी :  कोरोना व्हायरसच्या (COVID-19) महासाथीमुळे ऑफिसातील वर्क कल्चरमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण (Coronavirus) रोखण्यासाठी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होमची (Work From Home) सुविधा दिली जात आहे. याअंतर्गत कर्मचारी आपलं ऑफिसचं काम घरुन करू शकत आहेत. आता सरकार यावर अधिक तयारी करीत आहे. ज्यानुसार कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याची संधी मिळेल. श्रम मंत्रालयाने यासाठी शुक्रवारी एक ड्राफ्ट जारी केला आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार नव्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विस सेक्टरमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल.

IT सेक्टरला मिळेल दिलासा - श्रम मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम ड्राफ्टनुसार आयटी सेक्टरला अनेक सवलत मिळू शकते. या ड्राफ्टमध्ये आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तासातही सवलत मिळू शकते. श्रम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही ड्राफ्टमध्ये विचार करण्यात आला आहे. सर्विस सेक्टरच्या गरजेनुसार पहिल्यांदाच वेगळा मॉडेल तयार करण्यात आला आहे.

ड्राफ्टमध्ये अनेक सवलती

नवीन ड्राफ्टमध्ये सर्व कामगारांसाठी रेल्वे प्रवासाची सुविधाची उपाययोजना करण्यात आली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ खाण क्षेत्रातील कामगारांसाठी होता. तर नवीन ड्राफ्टमध्ये नियम तोडल्यास शिक्षाही देण्यात येणार आहे.

सरकारनेन ड्राफ्टवर मागितल्या सूचना

श्रम मंत्रालयाने new Industrial Relations Code वर सर्वसामान्यांच्या सूचना मागितल्या आहे. जर तुम्हाला काही सूचना द्यावयाची असल्यास 30 दिवसांच्या आत श्रम मंत्रालयाला पाठवा.

First published:
top videos

    Tags: Work from home