मराठी बातम्या /बातम्या /मनी /

देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहजपणे करता येणार UPI Payment

देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहजपणे करता येणार UPI Payment

देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहजपणे करता येणार UPI Payment

देशी पेमेंट सिस्टीमचा विदेशात वाजणार डंका! अमेरिकेतही सहजपणे करता येणार UPI Payment

सुत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेत UPI सोबतच Rupay Card लाँच केलं जाईल. यामुळं विविध कारणासाठी अमेरिकेत लोकांना फायदा होणार आहे. विशेषत: अमेरिकेला भेट देणारे भारतीय पर्यटक, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच तिथं काम करणाऱ्या भारतीयांना याचा फायदा होणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

आलोक प्रियदर्शी/ मुंबई, 29 सप्टेंबर:  अलीकडच्या काळात भारतानं विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. भारतात तयार झालेल्या अनेक गोष्टी जगभरातील अनेक देशानी स्वीकारल्या आहेत. आता भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. भारताची UPI पेमेंट सिस्टीम लवकरच अमेरिकेत लाँच केली जाणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अमेरिकेत UPI सोबतच Rupay Card लाँच केलं जाईल. यामुळं विविध कारणासाठी अमेरिकेत लोकांना फायदा होणार आहे. विशेषत: अमेरिकेला भेट देणारे भारतीय पर्यटक, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच तिथं काम करणाऱ्या भारतीयांना याचा फायदा होणार आहे.

ही पेमेंट सिस्टीम लाँच झाल्यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या अनेक भारतीयांना ऑनलाईन पेमेंट करणं सुलभ होईल. ही यूपीआय पेमेंट सिस्टीम लाँच करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेतील विविध कंपन्यांशी भागीदारीसाठी चर्चा सुरु आहे. सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता केल्यानंतर अमेरिकेतही भारतीय पद्धतीने यूपीआय पेमेंट करता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं हजारो भारतीयांना फायदा होणार आहे.

हेही वाचा:RBI Tokenization: 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट-डेबिट कार्ड टोकन बनवणं आवश्यक, वाचा प्रोसेस अन् फायदे

व्यवसाय, नोकरी, शिक्षण, पर्यटन अशा विविध कारणांसाठी लाखो भारतीय विदेशात जात असतात. जगभरातील विविध देशांमध्ये अनेक भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अमेरिकेमध्येही लाखो भारतीय विविध कारणांसाठी भेट देत असतात. पर्यटक, व्यावसायिक शिष्टमंडळ आणि अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच अमेरिकेतही UPI द्वारे पेमेंट आणि व्यवहार करणं शक्य होणार आहे. यासाठी NPCI आणि RBI अमेरिकेच्या प्राधिकरणाशी बोलणी करत आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्या पेपल, स्ट्राइप, वर्ल्डपे इव्हलॉन आणि पेमेंटवॉल इत्यादींशी भागीदारी होऊ शकते.

First published:

Tags: Online payments, Upi