Home /News /money /

कर्मचाऱ्याचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी कंपनीने खर्च केले 50 लाख; 180 सीटर प्लेन केलं बुक

कर्मचाऱ्याचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी कंपनीने खर्च केले 50 लाख; 180 सीटर प्लेन केलं बुक

एकीकडे लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे खासगी कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करीत असताना या कंपनीने घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं जात आहे

    इंदूर, 27 ऑगस्ट : विसुविअस इंडिया लिमिटेड (Vesuvius India Limited) नावाच्या एका कंपनीने जगभरात असं उदाहरण ठेवलं आहे जे सर्वसाधारणपणे पाहायला मिळत नाही. कलकत्तामधील या कंपनीने आपल्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह इंदूरमध्ये त्यांच्या घऱी पोहोचविण्यासाठी 180 सीटर प्लेन (180 Seater Flight) बुक केलं. कुटुंबीयांनी सांगितले की कलकत्त्याहून विमानाची सोय झाली नाही तर कंपनीने कुटुंबीयांकडून कोणत्याही प्रकारची मदत घेतली नाही. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की आम्ही कधी विचारही केला नव्हता, की कंपनी इतका मोठं पाऊल उचलेल. कंपनीने यासाठी तब्बल 50 ते 60 लाखांचा खर्च करीत कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह सोपवला. कंपनीचे दोन अधिकारीदेखील तीन दिवसांपर्यंत इंदूरमध्ये राहिले आणि सर्व मृत्यूनंतरचा विधी संपल्यानंतर परतले. हे ही वाचा-कोरोनात 25000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; प्रसिद्ध कंपनीने घेतला निर्णय कलकत्त्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला होता मृत्यू इंदूरच्या उषानगर एक्टेंशनचे निवासी रितेश डुंगरवाल कलकत्त्यातील एका कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते कंपनीसोबत दोन पेक्षा अधिक काळापासून जोडले गेले होते. रितेशचे नातेवाईक बादल चौरडिया याने सांगितले की, रितेश यांचा 19 ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कलकत्त्याहून इंदूरला आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कोरोनाच्या कहरामुळे मृतदेह आणणे कठीण झाले होते. अशातच कंपनीने तात्काळ 30 कर्मचारी त्यांच्या घरी पाठवले. त्याच दिवशी त्यांनी रितेशचा मृतदेह त्याच्या घरी इंदूरला पाठवण्यासाठी प्लेनची व्यवस्था केली. बादल पुढे म्हणाले की, कंपनीला मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी 50 ते 60 लाखांचा खर्च आला असेल, कारण रुटीनमध्ये तब्बल 5000 रुपये एका व्यक्तीचं तिकीट असलं. त्याशिवाय तीन विविध लोकेशनहून मॉनिटर करीत इंदूरला प्लेन पाठविण्यात आलं, त्याशिवाय प्लेन रिकामी परतलं. त्यामुळे कंपनीने यासाठी खूप खर्च केला. कंपनीने जे उदाहण निर्माण केलं आहे त्याचा आम्ही विचारही करू शकत नाही.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या