Home /News /money /

थालीनॉमिक्‍स : शाकाहारी भोजन करणारे 10 हजार रुपयांपेक्षा जास्त करतात बचत

थालीनॉमिक्‍स : शाकाहारी भोजन करणारे 10 हजार रुपयांपेक्षा जास्त करतात बचत

तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी यावर तुमचं बजेट अवलंबून आहे. 2015-16 च्या तुलनेत यावर्षी शाकाहारी थाळीच्या किंमती कमी झाल्या आहेत.

    नवी दिल्ली, 31 जानेवारी : तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी यावर तुमचं बजेट अवलंबून आहे. उद्याच्या बजेटच्या आधी आलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज थाळीच्या घटत्या किंमतींचा उल्लेख करण्यात आला आहे. 2015-16 च्या तुलनेत यावर्षी शाकाहारी थाळीच्या किंमती कमी झाल्या आहेत. डाळ आणि भाज्यांच्या किंमती वाढल्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर 2019 मध्ये थाळीचे भाव वाढले होते. आता मात्र शाकाहारी थाळी स्वस्त झाली आहे. 25 राज्यांत सर्व्हे एक सामान्य माणूस थाळीसाठी किती खर्च करतो याचा आढावा आर्थिक पाहणी अहवालात घेण्यात आला. दैनंदिन आहाराशी संबंधित घटकांचा विचार करून या थाळीसाठी किती खर्च येतो याचा अंदाज घेण्यात आला. 25 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. आधीच्या तुलनेत 2019 - 2020 मध्ये शाकाहारी भोजनाची थाळी 29 टक्क्यांनी आणि मांसाहारी थाळी 18 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. (हेही वाचा : या बजेटमध्ये इनकम टॅक्समध्ये मिळणार मोठा दिलासा? आर्थिक पाहणी अहवालाचे संकेत) 5 सदस्यांचं कुटुंब सर्व्हेनुसार. 5 सदस्यांच्या कुटुंबामध्ये दोन पौष्टिक थाळ्या घेतल्या तर सरासरी 10 हजार 887 रुपयांचा फायदा होतो. त्याचवेळी मांसाहारी थाळीसाठी तेवढ्याच कुटुंबाला 11 हजार 787 रुपयांचा खर्च येतो. थालीनॉमिक्स आर्थिक पाहणी अहवालानुसार, 2015 - 2016 मध्ये थाळीच्या किंमतीत मोठे बदल झाले. सरकारने कृषी उत्पादकता आणि कृषी बाजारातली कुशलता वाढवण्यासाठी काही सुधारणा केल्या. यानुसार पारदर्शी पद्धतीने किंमती ठरल्या. त्यामुळे थाळीच्या किंमती घटण्यात मदत झाली. मांसाहारी थाळीच्या किंमती मात्र शाकाहारी थाळीच्या तुलनेत जास्त आहेत. ====================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Budget 2020, Money

    पुढील बातम्या