एका ट्विटमुळे कंपनीला 1 लाख कोटींचा फटका तर वैयक्तिक 22.6 हजार कोटींचं नुकसान

टेस्लाचे संस्थापक अॅलन मस्क यांच्या एका ट्विटमुळे कंपनीला तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

टेस्लाचे संस्थापक अॅलन मस्क यांच्या एका ट्विटमुळे कंपनीला तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

  • Share this:
    कॅलिफोर्निया, 02 मे : टेस्लाचे संस्थापक अॅलन मस्क यांच्या एका ट्विटमुळे कंपनीला तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर त्यांना वैयक्तिक 22.6 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. अॅलन मस्क यांनी एक मे ला अनेक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी टेस्ला कंपनीचे शेअर सर्वाधिक किंमतीचे असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांनी आपली सर्व संपत्ती विकणार असल्याचंही ट्विट केलं होतं. शेअर बाजारात कंपनीला शुक्रवारी फटका बसला. शेअरमध्ये जवळपास दहा टक्क्यांहून जास्त घसरण झाली. शुक्रवारी शेअर्सची किंमत 755 डॉलर होती ती सायंकाळी बंद होईपर्यंत 701 डॉलरवर पोहोचली होती. याआधी अॅलन मस्क यांनी 2018 मध्येही अशाच प्रकारची ट्वीट केले होते. त्यात त्यांनी टेस्ला कंपनीच्या खाजगीकरणाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 20 टक्के खाली आले होते. याशिवाय त्यांना आणि कंपनीला दंडही भरावा लागला होता. तसंच अॅलन मस्क यांनी कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे,वाचा कशी काढाल रक्कम एका लाइव्ह शोमध्ये अॅलन मस्क हे व्हिस्की पीत होते. त्यासोबत गांजाही ओढताना दिसले होते. कॅलिफोर्नियातील कॉमेडिअन जो रोगन याच्यासोबत स्टेजवर असताना 2018 मध्ये त्यांनी हे कृत्य केलं होतं. त्यानंतर कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली होती. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. हे वाचा : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा VIDEO समोर, पाहा काय करतायत?
    First published: