इंटरनेट युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता दररोज मिळणार 5 GB डेटा

इंटरनेट युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता दररोज मिळणार 5 GB डेटा

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये खाजगी कंपन्यांचं वर्चस्व होतं. अशावेळी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी BSNL कडून आपल्या ग्राहकांना नवनवीन ऑफर देण्यात येतात. BSNLची नवी ऑफर वाचून तुम्ही नक्की थक्क व्हाल.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये खाजगी कंपन्यांचं वर्चस्व होतं. अशावेळी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी BSNL कडून आपल्या ग्राहकांना नवनवीन ऑफर देण्यात येतात. जेणेकरून ग्राहक बीएसएनएलसोबत टिकून राहील. त्याचप्रमाणे त्यांच्या सध्याच्या प्लॅन्समध्ये बदल देखील करण्यात येतो. त्यातच गेल्यावर्षी वोडाफोन, आयडिया यांसारख्या खाजगी कंपन्यांच्या झालेल्या तोट्याचा फायदा बीएसएनल ने उचलला. आता कंपनीने जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी भन्नाट प्लॅन आणला आहे. 90 दिवसांची वैधता असणारा हा 551 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये एकून 450 GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच दररोज 1-2 नव्हे तर 5 GB डेटा ग्राहकांना वापरण्यात येणार आहे.

(हे वाचा-PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, ग्राहकांच्या खात्यावर होणार हे परिणाम)

BSNL कडून देण्यात आलेल्या प्लॅनचा इंटरनेट युजर्सना फायदा होणार आहे. मात्र हा प्लॅन केवळ डेटासाठी आहे. यामध्ये कॉलिंग, SMS किंवा इतर सुविधा नाही आहेत. त्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी तुम्हाला वेगळा रिचार्ज करावा लागेल. शिवाय बीएसएनलचे इतर काही प्लॅन्सही ग्राहकांच्या फायद्याचे आहेत. 998 रुपयांचा आणि 240 दिवसांची वैधता असणाऱ्या प्लॅनमध्ये दर दिवसाला 2 जीबी डेटा मिळतो. तर या प्लॅनची खासियत म्हणजे आणखी 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. म्हणजेच या प्लॅनचा फायदा 240 आणि 30 म्हणजे 270 दिवस घेता येतो. पण हा प्लॅन तेव्हाच उपलब्ध करून घेता येईल जर तुम्ही 31 मार्च 2020 आधी रिचार्च केला तर.

(हे वाचा-कोरोनामुळे जगभरातील अब्जाधीशांचं कोट्यवधींचं नुकसान, सर्वसामान्यांनाही बसणार झळ)

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात खासगी कंपन्यांनी टॅरिफमध्ये दरवाढ केली. याचाच फायदा बीएसएनएलला झालाय. 2019 मध्ये सर्वाधिक ग्राहक जोडणारी कंपनी BSNL आहे, अशी माहिती ट्रायने दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जिओ आहे. वोडाफोन-आयडियापासून अनेक ग्राहक गेल्या वर्षी दूर झाले. परिणामी, 2019च्या डिसेंबर महिन्यात BSNLसोबत 4.2 लाख तर जिओसोबत 82 हजार 308 नवे ग्राहक जोडले गेले.

Tags: BSNLTRAI
First Published: Mar 4, 2020 02:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading