मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Tega Industries IPO ला दमदार प्रतिसाद, शेवटच्या दिवशी 219 पट सबस्क्रिप्शन

Tega Industries IPO ला दमदार प्रतिसाद, शेवटच्या दिवशी 219 पट सबस्क्रिप्शन

 तेगा इंडस्ट्रीज लि.च्या आयपीओला (Tega Industries Ltd IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, अर्जाच्या शेवटच्या दिवशी एकूण 219.04 वेळा सबस्क्रिप्शन मिळाले.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 5 डिसेंबर : शेअर बाजार यावर्षी अनेक IPO यशस्वीरित्या लिस्ट झाले आहेत. अनेक IPO ना गुंतवणूकदारांचा दणदणीत प्रतिसाद मिळाला तर काहींनी निराशा केली. आता खाण उद्योगासाठी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या तेगा इंडस्ट्रीज लि.च्या आयपीओला (Tega Industries Ltd IPO) गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, अर्जाच्या शेवटच्या दिवशी एकूण 219.04 वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, कंपनीला एकूण 2,09,58,69,600 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. तर कंपनीने 619.22 कोटी रुपयांच्या या IPO अंतर्गत 95,68,636 शेअर्स ऑफर केले होते. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (Non Institutional Investors) श्रेणीमध्ये 666.19 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) च्या बाबतीत 215.45 पट आणि रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदार (Retail Individual Investors) श्रेणीमध्ये 29.44 पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. 31 डिसेंबरआधी 'हे; काम करुन घ्या, अन्यथा 5 हजारांचा दंड भरावा लागेल पूर्णपणे OFS ग्लोबल मिनरल कंपन्यांना स्क्रीनिंग, खाणकाम आणि मटेरियल हँडलिंग यासारख्या सेवा पुरवणाऱ्या टेगा इंडस्ट्रीजने आयपीओची किंमत 443 ते 453 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर होता म्हणजेच Offer For Sale. अशा परिस्थितीत कंपनीला या IPO मधून कोणताही निधी मिळणार नाही. शेअर बाजारात मंदीत संधी! पडझडीदरम्यान ब्रोकरेज फर्मची 'हे' शेअर खरेदीची शिफारस तेगा इंडस्ट्रीज लिमिटेड काय करते? रेवेन्यू आधारावरप टेगा इंडस्ट्रीज ही पॉलिमर आधारित मिल लाइनरची निर्मिती करणारी देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कोलकाता स्थित तेगा इंडस्ट्रीज स्वीडनच्या स्काजा एबीच्या सहकार्याने 1978 मध्ये भारतात स्थापन करण्यात आली. नंतर प्रमोटर मदन मोहन मोहना यांनी 2001 मध्ये कंपनीतील स्केज AB चे संपूर्ण स्टेक विकत घेतले.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या