मुंबई, 4 फेब्रुवारी- स्मार्टफोन इंडस्ट्रीसाठी फेब्रुवारी महिना अतिशय व्यस्त आणि महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, पुढील चार आठवड्यांत अनेक प्रमुख ब्रँड आपली प्रॉडक्ट्स लाँच करणार आहेत. यामध्ये सॅमसंगची गॅलेक्सी S23 सीरिज, व्हिवोची X90 सीरिज, वन प्लसची 11 सीरिज, iQOO चा निओ 7 5G, शाओमीची 13 सीरिज आणि रिअलमीचा 10 5G यांचा समावेश आहे. या लाँचमुळे स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.
या स्मार्टफोन्समध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट, 200-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर्स आणि 120 व्हॅट चार्जिंग स्पीड यांसारखी हाय-एंड फीचर्स असण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 (MWC 2023) देखील होणार आहे. त्यामुळे विक्रेत आणि ग्राहकांचा उत्साह वाढेल.
(हे वाचा:स्मार्टफोनच्या किंमती पुन्हा वाढणार, नेमकं कारण काय? )
सॅमसंगनं 1 फेब्रुवारी रोजी आपल्या अनपॅक्ड इव्हेंटमध्ये गॅलेक्सी S23 सीरिजमधील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची नवीन आवृत्ती लाँच केली. ही सीरिज, फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन आणि लॅव्हेंडर या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. S23 ची किंमत 74 हजार 999 रुपये, S23+ ची 94 हजार 999 रुपये आणि S23 अल्ट्राची किंमत एक लाख 24 हजार 999 रुपये आहे. गॅलेक्सी S23 अल्ट्रामध्ये 200 मेगापिक्सेल सेन्सरसह फोर-कॅमेरा सेटअप आहे. या सीरिजमधील मोबाईल फोनमध्ये Qualcomm चा स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC हा प्रोसेसर असेल.
व्हिवो X90 सीरिज: तीन फेब्रुवारी रोजी ही सीरिज लाँच झाली. या फोनमध्ये कॅमेरासाठी Zeiss ऑप्टिक्स लेन्स आणि टॉप-एंड स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट फीचर्स असू शकतात अशी अपेक्षा आधी वक्त केली जात होती. चीनमधील बाजारपेठांमध्ये ओरिजिन OS आणि इतर बाजारपेठांमध्ये फनटच OS सह हे फोन उपलब्ध होतील.
वन प्लस 11 सीरिज: 7 फेब्रुवारी रोजी लाँच होणारी वनप्लस 11 सीरिज ही आपल्या वनप्लस 11R या फोनचं मॉडेल भारतीय बाजारपेठेत आणेल अशी अपेक्षा आहे. हा फोन चीनमध्ये गेल्या महिन्यात सादर करण्यात आला होता. वनप्लस 11मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC हे प्रोसेसर असेल आणि त्याच्या मागील बाजूस तिसऱ्या पिढीचा हॅसलब्लॅड कॅमेरा असेल. वनप्लस 11Rमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट असेल.
iQOO निओ 7 5G: iQOO चा निओ 7 5G हा मोबाईल फोन 17 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. हा फोन MediaTek Dimensity 8200 चिपसेटसह मिळेल. या फोनमधील फास्ट चार्जिंग फीचर सर्वात महत्त्वाचं आहे. हा फोन 120W गतीनं चार्ज होतो.
शाओमी 13 सीरिज: शाओमीची 13 सीरिज, जागतिक बाजारपेठेसाठी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC 2023) प्रदर्शित केली जाण्याची शक्यता आहे. हा कदाचित भारतातील Leica-चालित कॅमेरे असलेला पहिला शाओमी फोन असेल. सीरिजमधील फोन Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह मिळण्याची अपेक्षा आहे.
रिअलमी 10 5G: रिअलमीचा 10 5G हा, 10 प्रो सीरिज आणि 10 4G प्रकारानंतर 10 सीरिजमधील नवीन अॅडिशन आहे. हे डिव्हाइस भारतात लाँच होण्यासाठी तयार आहे. 10 सीरीज आपल्या लाइनअपवरील फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Technology