नोकरी जाण्याच्या भीतीने तिने केली आत्महत्या, IT क्षेत्रावर कर्मचारी कपातीचं संकट

नोकरी जाण्याच्या भीतीने तिने केली आत्महत्या, IT क्षेत्रावर कर्मचारी कपातीचं संकट

हैदराबादच्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षांच्या महिला तंत्रज्ञाने आत्महत्या करण्याची घटना घडलीय. या तरुणीच्या कंपनीमध्ये कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली होती.

  • Share this:

हैदरबाद, 21 नोव्हेंबर : हैदराबादच्या आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षांच्या महिला तंत्रज्ञाने आत्महत्या करण्याची घटना घडलीय. या तरुणीच्या कंपनीमध्ये कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्याचा ताण येऊन या तरुणीने आत्महत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं. ही तरुणी ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर काम करत होती. नोकरी जाण्याच्या भीतीने तिने वसतिगृहात पंख्याला लटकून घेऊन आत्महत्या केली.

कर्मचारी कपातीची नोटीस

तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना डिसेंबरमधल्या कर्मचारी कपातीची नोटीस देण्यात आली होती.ही तरुणी मूळची मेहबूबनगर जिल्ह्यात राहणारी आहे. ती गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत काम करत होती.

आयटी क्षेत्रात सुमारे 40 हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. आयटी क्षेत्रातले तज्ज्ञ मोहनदास पै यांनी हा खबरदारीचा इशारा दिलाय. कोणत्याही पूर्ण वाढ झालेल्या क्षेत्रात दर पाच वर्षांनी कर्मचारी कपातीची वेळ येते. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत उत्पादकता कमी झाली तर कंपनीला कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो, असं मोहनदास पै यांनी म्हटलं होतं.

(हेही वाचा : 'आई आजारी आहे, मदत करा',Facebook वर फेक अकाउंट बनवून तरुणाला घातला गंडा)

असं का घडतं?

पै म्हणाले, पाश्चिमात्य देशांत सगळ्याच क्षेत्रांत असं होत असतं. भारतातही जेव्हा एखाद्या उद्योगाची वाढ पूर्ण होते तेव्हा मध्यम स्तरावरचे काही कर्मचारी त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत जास्त पैसे मिळवू शकत नाहीत.जेव्हा कंपन्यांची वेगाने वाढ होते तेव्हा प्रमोशन दिली जातात. पण कंपनीची अपेक्षित वाढ होत नाही तेव्हा मात्र याच जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली असते.

5 वर्षांनी कपात

या स्थितीत कंपन्यांना दर पाच वर्षांनी आपल्या कर्मचारी संख्येचा आढावा घ्यावा लागतो आणि कर्मचारी कपात करावी लागते. जर तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या पगारानुसार काम केलं नाही तर जास्त पगाराला काहीच अर्थ उरत नाही.

आयटी उद्योगात 30 हजार ते 40 हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते. असं असलं तरी 80 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांमुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

==========================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 21, 2019, 5:38 PM IST
Tags: jobsmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading