खासगी कंपनीतही मोठी पगारवाढ, 'या' कंपन्यांसाठी आहे खूशखबर

खासगी कंपनीतही मोठी पगारवाढ, 'या' कंपन्यांसाठी आहे खूशखबर

Hike in Salary - 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक खासगी कंपनीत काम करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता त्यांच्यासाठीही चांगली बातमी आहे

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : जुलै महिना संपत आला की सगळ्यांना वेध लागतात ते इन्क्रिमेंटचे. म्हणजे पगारवाढीचे.खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यावर्षी 6 मेट्रो शहरांमध्ये पगार हा डबल डिजिटमध्ये वाढणार आहे. भारतात 9 मोठ्या शहरांपैकी 6 शहरांमध्ये यावर्षी पगारवाढ दोन आकड्यांमध्ये असणार आहे. Team-Lease च्या वार्षिक रिपोर्टमध्ये असं म्हटलंय. त्यांच्या मते या शहरांमध्ये पगारात 10-11 टक्के वाढ होणार आहे.

या क्षेत्रात चांगली वाढ होण्याचा अंदाज

या अहवालानुसार टीम लीजनं 9 शहरांमध्ये 17 क्षेत्रांतल्या 2 लाख पगाराचे रेकाॅर्डस् पाहिले. याच्या आधारावर हा अहवाल सादर केला. त्यात दिल्लीत FMCD (फास्ट मुव्हिंग कंझ्युमर ड्युरेबल्स) क्षेत्रात 11 टक्के आणि बंगळुरूमध्ये टेक-स्टार्टअप सेक्टरमध्ये 10.8 टक्के पगारवाढ मिळू शकते. तसंच BFSI, BPO/IT services, ई-कॉमर्स, एज्युकेशनल सर्विसेस, एफएमसीजी, हेल्थ केयर आणि फार्मा याही क्षेत्रात पगारवाढ होऊ शकते.

LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, रोज फक्त 9 रुपये खर्च आणि लाखोंचा फायदा

खूशखबर! 12 दिवसांनी झालं डिझेल स्वस्त, पेट्रोलच्या दरातही घसरण

या क्षेत्रात कमी वाढ

कृषी, अॅग्रोकेमिकल्स, ऑटोमोबाइल्स, कंस्ट्रक्शन, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग, मीडिया, एनर्जी, रिटेल आणि टेलिकॉम बिझनेस इथल्या कर्मचाऱ्यांना कमी पगारवाढ मिळेल.

'ती' दागिने चोरून गिळायची; डॉक्टरांनी पोटातून काढलं दीड किलो सोन

या प्रोफाइलच्या लोकांना मिळेल भरपूर पगारवाढ

मुंबईत ई काॅमर्स आणि टेक स्टार्टअपचे मुख्य टेक्निकल ऑफिसर्स यांना सर्वात जास्त म्हणजे 17 टक्के पगारवाढ मिळू शकते. 15 टक्क्यांपेक्षा जास्त इन्क्रिमेंट मिळणाऱ्यांमध्ये ऑटोमोबाइल डिझाइन इंजिनियर्स, कन्स्ट्रक्शनमध्ये चीफ प्लॅनिंग ऑफिसर, एनर्जी इंजीनियर्स आणि आईटी, हेल्थकेयर आणि फार्मा इथले इंजिनियर्स यांचा समावेश आहे.

VIDEO : लग्न एकदाच होतं, 'जन्म जन्म का साथ' असं काही नसतं, ओवेसींची लोकसभेत फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Salary
First Published: Jul 25, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या