पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकांच्या 78 जागांवर भरती, असा करा अर्ज

Pimpari, Teacher Jobs - तुम्हाला शिक्षकाची नोकरी करायची असेल तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत चांगली संधी आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 05:45 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकांच्या 78 जागांवर भरती, असा करा अर्ज

मुंबई, 5 जुलै : तुम्हाला शिक्षकाची नोकरी करायची असेल तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत चांगली संधी आहे. सहाय्यक शिक्षक या पदावर नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी 78 जागा आहेत. त्यात मराठी माध्यमासाठी 60 आणि उर्दू माध्यमासाठी 18 जागा आहेत. तुम्ही https://www.pcmcindia.gov.in/marathi/ इथे अधिक माहिती मिळवू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 जुलै.

पद आणि संख्या

सहाय्यक शिक्षक ( मराठी माध्यम ) - 60

सहाय्यक शिक्षक ( उर्दू माध्यम ) - 18

12वी पास असलेल्यांना रेल्वेत संधी, अशी होणार भरती

Loading...

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक शिक्षक मराठीसाठी  B.Sc B.Ed/ B.A B.Ed/ B.Sc.BP.Ed/ B.A BP.Ed या पदव्या हव्यात.

सहाय्यक शिक्षक उर्दूसाठी B.Sc B.Ed/ B.A B.Ed पदव्या हव्यात.

Union Budget 2019 : 20 रुपयांच्या नाण्यांची ही असेल खासीयत

नोकरीचं ठिकाण

पिंपरी

अर्ज फी नाही. अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता - मा. अति. आयुक्त माध्यमिक शिक्षण विभाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे- 18

Union Budget 2019 : बजेटनंतर शेअर मार्केट गडगडलं

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 12 जुलै 2019 ( सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत )

दरम्यान, नागपूर विद्यापीठातही 117 असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी अर्ज मागवलेत. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै. या पदांवर उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल. कुठलीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही.

असिस्टंट प्रोफेसर पदांवर अर्जासाठी 55 टक्के आणि मास्टर डिगरी हवी. उमेदवारानं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) उत्तीर्ण असायला हवी.

असिस्टंट प्रोफेसर पदांवर इंटरव्ह्यूच्या आधारे निवड होईल. यासाठी उमेदवाराला परीक्षा द्यायची गरज नाही. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://www.nagpuruniversity.org/rtmnu/home/ यावर क्लिक करा. उमेदवार 15 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात.

VIDEO: ...म्हणून जितेंद्र आव्हाडांनी या पोलिसांकडे सोपवले खेकडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...