खुशखबर : TCS आता देणार फ्रेशर्सना दुप्पट पगार

खुशखबर : TCS आता देणार फ्रेशर्सना दुप्पट पगार

TCS डिजिटल स्किलसेट असणाऱ्या फ्रेशर्सची भरती करणार आहे. फ्रेशर्सना चांगलं पॅकेजही देण्यात येणार आहे. TCS कंपनी 1 हजार फ्रेशर्सची भरती करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

  • Share this:

मुंबई, ४ ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) डिजिटल स्किलसेट असणाऱ्या फ्रेशर्सची भरती करणार आहे. यासोबत फ्रेशर्सना चांगलं पॅकेजही देण्यात येणार आहे. मीडियाच्या एका अहवालानुसार, TCS कंपनी 1 हजार फ्रेशर्सची भरती करणार असल्याचं सांगण्यात येतंय. आयटी क्षेत्रात पदवी प्राप्त असणारे अनेक इंजिनिअर आहेत सध्या चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेली काही वर्षं चांगल्या कंपन्यांनी नवीन नोकरभरतीमध्ये हात आखडता घेतला होता. आता टीसीएसच्या निर्णयामुळे या लोकांना नवीन आशा मिळाली आहे.

TCS ही एक नामांकित आयटी कंपनी आहे ज्यामध्ये अनेक लोकांचं काम करण्याचं स्वप्न असतं. यंदा कँपस इंटरव्ह्यूजमधून कंपन्यांसाठी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. आयटी क्षेत्राला उतरती कळा लागली की काय याची चर्चा सुरू असतानाच टीसीएसकडून ही चांगली बातमी आली आहे.

एका बिझनेसविषयक माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार  TCS मध्ये कँपसमधून सिलेक्ट झालेल्या फ्रेशर्सपेक्षा या नव्या फ्रेशर्सना दुप्पट पगार देणार असल्याची माहिती समोर आलीय. जर कँपसमधून सिलेक्ट झालेल्या फ्रेशर्सना 3.5 लाख रुपयांचं वार्षिक सॅलरी पॅकेज ऑफर केलं जात असेल तर डिजिटल स्किलमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या 6.5 लाख रुपयांचं पॅकेज देण्यात येणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, TCS कंपनीने कर्मचारी नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. यानुसार डिजिटल स्किलमध्ये पारंगत असलेल्या फ्रेशर्सची एक टेस्ट घेतली जाणार आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर या फ्रेशर्सची निवड होणार आहे. यावर्षी TCS ने नॅशनल क्वालिफायर टेस्ट (NQT) या नवीन प्रक्रियेच्या माध्यमातून फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या टेस्टमध्ये पास झालेल्या उमेदवारांची नंतर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीचा टप्पा पार केलेल्यांना ऑफर लेटर देण्यात येतं.

First published: October 4, 2018, 12:28 PM IST

ताज्या बातम्या