Home /News /money /

TCS ने इतिहास रचला, 'या' अमेरिकन कंपनीला मागे टाकतं बनला दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड

TCS ने इतिहास रचला, 'या' अमेरिकन कंपनीला मागे टाकतं बनला दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड

ब्रँड व्हॅल्युएशन करणारी कंपनी 'ब्रँड फायनान्स'नं दिलेल्या रिपोर्टनुसार (Brand Finance Report), जगातील सर्वात मौल्यवान आयटी ब्रँडच्या यादीत टीसीएस आणि इन्फोसिस (Infosys) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

नवी दिल्ली, 27 जानेवारी: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान आयटी ब्रँड (Second Most Valuable IT Brand) ठरला आहे. TCS व्यतिरिक्त, इतर पाच भारतीय आयटी कंपन्यांनी जगातील टॉप-25 आयटी कंपन्यांमध्ये (IT Company) स्थान मिळवलं आहे. ब्रँड व्हॅल्युएशन करणारी कंपनी 'ब्रँड फायनान्स'नं दिलेल्या रिपोर्टनुसार (Brand Finance Report), जगातील सर्वात मौल्यवान आयटी ब्रँडच्या यादीत टीसीएस आणि इन्फोसिस (Infosys) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. याशिवाय इतर चार मोठ्या देशांतर्गत आयटी कंपन्यांनीही टॉप-25 मध्ये आपलं स्थान कायम राखलं आहे. विप्रो (Wipro) सातव्या, एचसीएल (HCL) आठव्या, टेक महिंद्रा (Tech Mahindra) 15व्या आणि एलटीआय (LTI) 22व्या स्थानावर आहे. अ‍ॅक्सेंचर यावर्षीही पहिल्या स्थानावर अ‍ॅक्सेंचर (Accenture) हा जगातील सर्वांत मौल्यवान आणि मजबूत आयटी सर्व्हिस ब्रँड आहे. रिपोर्टनुसार, अ‍ॅक्सेंचरची ब्रँड व्हॅल्यू (Brand Value) 36.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 2021मध्ये सुद्धा अ‍ॅक्सेंचर हा सर्वांत मौल्यवान आणि मजबूत आय ब्रँड होता. भारतीय ब्रँड असलेल्या टीसीएसची व्हॅल्यू मागील वर्षाच्या (2021) तुलनेत 12 टक्के आणि 2020च्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढली आहे. टीसीएसची सध्याची ब्रँड व्हॅल्यू 16.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिकी कंपन्यांना दिली मात 2020 ते 2022 दरम्यान भारतातील विविध आयटी सर्व्हिस ब्रँड्च्या व्हॅल्यूमध्ये सरासरी 51 टक्के वाढ झाली आहे तर यूएस आयटी कंपन्यांच्या (US IT Companies) ब्रँड व्हॅल्यूमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली. यामुळेच अमेरिकन कंपनी आयबीएम (IBM) 2022च्या यादीत दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे. आयबीएमची ब्रँड व्हॅल्यू 16.05 अब्ज डॉलर्सवरून 10.5 अब्ज डॉलर्सवर आली आहे. याचाच अर्थ भारतीय कंपन्यांनी अमेरिकन कंपन्यांना जोरदार मात दिली आहे. इन्फोसिस ठरली सर्वात वेगानं वाढणारी कंपनी व्हॅल्युएबल आयटी कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली, इन्फोसिस (Infosys) हा जगातील सर्वात वेगात वाढणारा आयटी सर्व्हिस ब्रँड ठरला आहे. गेल्या वर्षीच्या (2021) तुलनेत त्याची ब्रँड व्हॅल्यू 52 टक्के आणि 2020 च्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या इन्फोसिसची ब्रँड व्हॅल्यू 12.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. टीसीएसवर ग्राहकांचा विश्वास टीसीएसच्या मुख्य मार्केटिंग अधिकारी राजश्री आर (Rajshree R) यांनी सांगितलं की, मोस्ट व्हॅल्युएबल लिस्टमधील रँकिंग कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीचं सध्याचं स्थान, बाजारपेठेतील कंपनीच्या वाढत्या प्रासंगिकतेची, ग्राहकांसाठी तिच्या नवकल्पना आणि परिवर्तनाची साक्ष देते.

तुमच्या कामाची बातमी! जाणून घ्या कोणत्या Ration Card वर किती मिळतं धान्य

 'ब्रँड फायनान्स'चा रिपोर्ट पाहता भारतीय आयटी कंपन्यांनी मोठी मजल मारल्याचं निदर्शनास येतं. या कंपन्यांनी आपली वाटचाल अशीच सुरू ठेवली तर भविष्यात आयटी क्षेत्रामध्ये फक्त भारतीयांचा बोलबाला असेल, यात शंका नाही.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: TCS chairman

पुढील बातम्या