IT क्षेत्रात 'या' भारतीय कंपनीनं रचला इतिहास, जगात पटकावला तिसरा नंबर

अमेरिकन कंपनीला मागे टाकत एका भारतीय कंपनीनं जगातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये तिसरा नंबर पटकावलाय

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 01:44 PM IST

IT क्षेत्रात 'या' भारतीय कंपनीनं रचला इतिहास, जगात पटकावला तिसरा नंबर

मुंबई, 24 मे : आयटी सेवा पुरवणाऱ्या TCS या कंपनीनं एक नवा इतिहास रचलाय. TCS नं अमेरिकन कंपनी  DXC टेक्नाॅलाॅजीला मागे टाकत ती जगातली तिसरी सर्वात मोठी कंपनी झालीय. गेल्या आर्थिक वर्षात TCS ची मिळकत 2090 कोटी डाॅलर्स ( जवळजवळ 1,46,300 कोटी रुपये ) झालीय. DXC ची मिळकत 2070 कोटी डाॅलर ( जवळजवळ 1,44,900 कोटी रुपये ) झालीय. राजेश गोपीनाथन सीईओ झाल्यानंतर TCS नव्या उंचीवर पोचलीय. म्हणून आर्थिक वर्ष 2018-19साठी त्यांचा पगार 28 टक्के वाढलाय. आता तो 16 कोटी झालाय.

SBI SO recruitment 2019 : 15 लाखापर्यंत पगार, असा करा अर्ज

TCS नं रचला इतिहास

वर्षाच्या सुरुवातीलाच TCS मार्केट व्हॅल्यूच्या हिशेबानं देशातली सर्वात मोठी कंपनी झालीय. तर मिळकतीच्या दृष्टीनं ती जगातली तिसरी मोठी कंपनी झालीय. DXC नं गुरुवारी आपल्या तिमाही मिळकतीची घोषणा केली. DXC नं आपल्या कामकाजाचं रिस्ट्रक्चरिंग केलंय. म्हणून कमाईवर प्रेशर दिसलं.

इथे ऑनलाइन करा गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त मिळेल व्याज

Loading...

मिळकतीच्या दृष्टीनं जगातली सर्वात मोठी कंपनी IBM आहे. याचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ 7500 कोटी डाॅलर्स आहे. यानंतर नंबर लागतो एसचेंरचा. आणि आता तिसरा नंबरवर आहे TCS.

तुम्ही ग्रॅज्युएट आहात? मग 'इथे' मिळेल 44,900 रुपये पगाराची नोकरी

राजेश गोपीनाथन सीईओ झाल्यानंतर TCS नव्या उंचीवर पोचलीय. म्हणून आर्थिक वर्ष 2018-19साठी त्यांचा पगार 28 टक्के वाढलाय. आता तो 16 कोटी झालाय. गेल्या वर्षी त्यांचा पगार होता 12.49 कोटी रुपये. ते सीईओ झाले तेव्हा त्यांचं पगाराचं पॅकेज 6.2 कोटी रुपये होता.


'आ देखे जरा किसमे कितना है दम', भाजप आमदाराच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ITTCS
First Published: May 24, 2019 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...