मराठी बातम्या /बातम्या /मनी /

करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल

करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केले बदल

अटल पेन्शन योजनेत किमान मासिक 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरू कराल, तितकाच तुम्हाला फायदा होईल.

अटल पेन्शन योजनेत किमान मासिक 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरू कराल, तितकाच तुम्हाला फायदा होईल.

अटल पेन्शन योजनेत किमान मासिक 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरू कराल, तितकाच तुम्हाला फायदा होईल.

  • Published by:  Pravin Wakchoure
नवी दिल्ली 11 ऑगस्ट : भविष्यातील आर्थिक गुंतवणुकीबाबत लोक आता जागृत झाले आहे. वृद्धापकाळात पैशांची कमतरता भासू नये म्हणून अनेकजण पेन्शन स्कीम्समध्ये पैसे गुंतवतात. जेणेकरुन त्याचा फायदा म्हातारपणी होईल. अटल पेन्शन योजना देखील सरकारची एक यशस्वी योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करुन लोक आपलं भविष्य सुरक्षित करु शकतात. मात्र मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सरकारने मोठा बदल केला आहे. या बदलाबाबत अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, आयकर भरणारे यापुढे अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. सरकारचा हा नियम आयकर भरणाऱ्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल. यानंतर, प्राप्तिकर कायद्यानुसार प्राप्तिकर भरणारी कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकत नाही. जर तो असे करताना आढळला तर त्याचे खाते त्वरित बंद केले जाईल. तसेच, तोपर्यंत जमा केलेले पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील. त्यात कोणतीही तफावत राहणार नाही, यासाठी शासनाकडून वेळोवेळी आढावाही घेतला जाणार आहे. दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सध्याच्या नियमांनुसार, जर तुम्ही भारताचे नागरिक असाल, तुमचे वय 18-40 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुमचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल, तर तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानंतर निश्चित वयोमर्यादेनंतर दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर (PFRDA) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेत 4 कोटींहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. पीएफआरडीएने सांगितले की 2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी लोकांनी यात खाती उघडली आहेत. यासह 31 मार्च 2022 पर्यंत योजनेच्या ग्राहकांची संख्या 4.01 कोटी झाली आहे. सरकारने ही योजना 2015 मध्ये सुरू केली होती. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन सरकारने APY सुरू केले होते. पण नंतर त्यात बदल करण्यात आला आणि आता 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यामध्ये नोंदणी करू शकतो. या योजनेत बदल केल्यानंतर आता आयकरदाते याचा भाग होऊ शकत नाहीत. अटल पेन्शन योजनेत किमान मासिक 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरू कराल, तितकाच तुम्हाला फायदा होईल. वयाच्या 18 व्या वर्षी योजनेत सामील होण्यासाठी, तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. नंतर तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये मिळतील.
First published:

Tags: Central government, Pension scheme

पुढील बातम्या