Tax Saving आणि चांगल्या फायद्यासाठी उपयोगी आहे म्युच्युअल फंडाची ही स्कीम

Tax Saving आणि चांगल्या फायद्यासाठी उपयोगी आहे म्युच्युअल फंडाची ही स्कीम

इक्विटी लिंक्ड स्कीम्स (ELSS ) ही पीपीएफ, एनएससी आणि बँक फिक्स्ड डिपाॅझिटच्या तुलनेत खूप चांगला पर्याय आहे.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : टॅक्स वाचवणं आणि गुंतवणुकीचा उत्तम परतावा यासाठी म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवले जातात. तज्ज्ञांच्या मते इक्विटी लिंक्ड स्कीम्स (ELSS ) ही पीपीएफ, एनएससी आणि बँक फिक्स्ड डिपाॅझिटच्या तुलनेत खूप चांगला पर्याय आहे. या स्कीमनं गेल्या पाच वर्षात 20 पट फायदा दिला आहे. ELSSCoD/S 1.5 लाख रुपये गुंतवले तर टॅक्सची बचतही होते.

काय आहे ELSS?

इक्विटी लिंक्ड सेंविग्स स्कीम्स (ELSS)मध्ये 65 टक्के रक्कम इक्विटी किंवा इक्विटी लिंक्ड प्राॅडक्टमध्ये गुंतवली जाते. लाँग टर्म कॅपिटल गेन्ससाठी 65 टक्के गुंतवणूक गरजेची आहे. 80सीसी मध्ये टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या स्कीममध्ये 3 वर्षांचा लाॅक इन पीरियड आहे.

मिळतो चांगला फायदा

तुम्ही गेल्या 5 वर्षांतल्या परताव्याकडे लक्ष दिलं तर रिलायन्स टॅक्स सेव्हर फंडनं 16.28 टक्के, DSP टॅक्स सेव्हर फंडनं 17.8 टक्के, एक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडनं 19.96 टक्के, आदित्य बिर्ला सन लाइफ टॅक्स रिलीफ 96 फंडनं 19.66 टक्के परतावा दिलाय.

लाॅक इन पीरियड कमी

PPF आणि NSCमध्ये लाॅक इन पीरियड खूप मोठा असतो. यात गुंतवलेले पैसे तुम्ही लगेच वापरू शकत नाहीत. PPFमध्ये 5 वर्षांनी थोडे पैसे तुम्ही काढू शकता. पण मॅच्युरिटी पीरियड आहे 15 वर्ष. NSCचा लाॅक इन पीरियड आहे 5 वर्ष. तर ELSSचा लाॅक इन पीरियड फक्त 3 वर्ष आहे.

1.50 लाख रुपयांची टॅक्स बचत

इन्कम टॅक्सच्या 80 C कलमानुसार ELSSमध्ये केलेल्य गुंतवणुकीमुळे कर वाचू शकतो. जास्त करून गुंतवणूकदार ELSSमध्ये पैसे गुंतवतात आणि मग हळूहळू दुसऱ्या म्युच्यअल फंडात गुंतवणूक सुरू करतात.

ELSSमध्ये ग्रोथ आणि डिव्हिडंड दोन्ही गोष्टींचा पर्याय आहे. त्यानं गुंतवणुकीदाराला फायदाच होतो.

#FitnessFunda : 'जय मल्हार'फेम देवदत्त नागे जिमलाच मानतो मंदिर

First published: February 12, 2019, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading