Home /News /money /

Tax Saving करताना 'या' चुका करु नका, भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं

Tax Saving करताना 'या' चुका करु नका, भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं

Tax Saving: शेवटच्या दिवसात कर बचत योजना तयार करताना बराच गोंधळ होतो, त्यामुळे काही चुका होण्याचा धोका आहे. अशाच काही गोष्टींची चर्चा करत आहोत.

    मुंबई, 27 मार्च : आर्थिक वर्ष 2021-22 संपायला काही दिवस उरले आहेत. तुमच्याकडे कर बचतीसाठी (Tax Saving) वेळ नाही. हे काम एक-दोन दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे. करबचतीचे काम वर्षभर सुरू असले, तरी काही व्यस्ततेमुळे हे काम करता आले नसेल, तर हे काम तातडीने पूर्ण करा. शेवटच्या दिवसात कर बचत योजना तयार करताना बराच गोंधळ होतो, त्यामुळे काही चुका होण्याचा धोका आहे. अशाच काही गोष्टींची चर्चा करत आहोत, ज्यामध्ये गुंतवणूकदार अनेकदा चुका करतात आणि त्यांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागते. एका योजनेत पैसे गुंतवणे शेवटच्या काळात कर नियोजन करत असताना, आपण अनेकदा संपूर्ण पैसे एकाच योजनेत किंवा एकाच प्रकारच्या योजनेत गुंतवतो. एकाच योजनेत किंवा एकाच प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करणे टाळावे. वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे शहाणपणाचे आहे. कारण, एकाच योजनेत गुंतवणूक केल्यास जोखीम वाढते. उदाहरणार्थ, आपण संपूर्ण पैसा जीवन विम्यात (Life Insurance) गुंतवू नये आणि सेवानिवृत्ती निधी (Retirement fund), सोने (Gold) यासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू नये. शेअर बाजारात सध्या खरेदीची संधी नाही, मोठ्या घसरणीचा वाट पाहा; निखील कामत यांचा सल्ला विमा योजनेकडे लक्ष द्या बहुतेक लोक मार्च महिन्यात विमा योजना घेतात, कारण विमा घेताना अनेकजण सुरक्षिततेबद्दल कमी आणि करबचतीबद्दल जास्त विचार करत असताक. त्यामुळेच अनेक लोक विमा योजनेशी संबंधित अटी आणि शर्तींकडे लक्ष देत नाहीत. कधीकधी आपण चुकीची योजना खरेदी करतो. म्हणूनच विमा उत्पादने अत्यंत हुशारीने खरेदी करणे महत्त्वाचे आहे. अधिक गुंतवणूक करा कर वाचवण्यासाठी, कर बचत योजनांमध्ये किती पैसे गुंतवले पाहिजेत याची निश्चितपणे गणना करा. तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे फक्त कर बचतीच्या योजनेत तर गुंतवत नाही ना याचाही विचार करा. काही वेळा जास्त पैसे गुंतवल्याने घराचे बजेट बिघडते. Tata ग्रुपची दमदार कामगिरी, 29 पैकी 12 स्टॉक्समध्ये 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न; तुमच्याकडे आहेत का कर दायित्वाची गणना न करणे उत्पन्नाच्या वेगवेगळ्या स्त्रोतांवर कर दायित्व देखील भिन्न आहे. यापैकी काही उत्पन्न असे देखील आहेत ज्यावर कर वाचवता येतो. म्हणून, गुंतवणूक करताना, सर्व प्रकारच्या उत्पन्नावर कर दायित्वाची रक्कम मोजून घ्या. यामुळे कर वाचवण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल हे जाणून घेणे सोपे होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Income tax, Money, Savings and investments, Tax

    पुढील बातम्या