मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दरमहा निश्चित उत्पन्नासाठी NPS योजना, कर बचतीसह होतात हे फायदे

दरमहा निश्चित उत्पन्नासाठी NPS योजना, कर बचतीसह होतात हे फायदे

दरमहा निश्चित उत्पन्न मिळावं यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme-NPS) सुरू करण्यात आली आहे.

दरमहा निश्चित उत्पन्न मिळावं यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme-NPS) सुरू करण्यात आली आहे.

दरमहा निश्चित उत्पन्न मिळावं यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme-NPS) सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: निवृत्तीवेतनाची सुविधा नसलेल्या नोकरदारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा इतर नागरिकांना म्हातारपणी दरमहा निश्चित उत्पन्न मिळावं यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme-NPS) सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेअर बाजाराशी (Share Market) निगडीत असल्यानं याद्वारे दीर्घकाळ शेअर बाजारातील गुंतवणूकीचा लाभ घेण्याची संधी मिळते. त्यामुळे यावर मिळणारा परतावा (Return) भरघोस असतो. तसंच कर बचतीचा (Tax Benefit) लाभ मिळत असल्याने त्या दृष्टीनेही ही योजना लाभदायी आहे. 80 सीसीडी (1) अंतर्गत करसवलतीचा फायदा: एनपीएसची टियर-1 (Tier -1) आणि टियर-2 (Tier-2) अशी दोन प्रकारची खाती असतात. टियर-1 हे संपूर्ण पेन्शन खातं (Pension Account) आहे तर टियर-2 हे एक गुंतवणूक खातं (Investment Account) आहे. वेतनदार लोक टियर-1 खात्यात वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये किंवा मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून वार्षिक वेतनाच्या (Annual Income) दहा टक्के रक्कम गुंतवू शकतात. तर अन्य लोक आपल्या एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 20 टक्के रक्कम गुंतवू शकतात. एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणुकीवर प्राप्तीकराच्या कलम 80 सीसीडी (1) अन्वये कर बचतीचा फायदा मिळतो. उदाहरणार्थ, तुमचे वार्षिक वेतन 20 लाख रुपये असेल तर तुम्ही त्याच्या 10 टक्के 2 लाख रुपये गुंतवू शकता, मात्र करबचत (Tax Benefit) सवलत तुम्हाला 1.5 लाख रुपयांवरच मिळेल. केंद्र सरकारी कर्मचारी टियर-2 खात्यातही 1.5 लाख रुपये गुंतवून त्यावर करसवलत घेऊ शकतात, मात्र याकरता किमान 3 वर्षे लॉक-इन कालावधी आहे. हेही वाचा-  Reliance Retail लाँच करणार 7-Eleven stores, पहिल्यांदाच भारतात येणार जागतिक स्तरावरील सुविधा प्राप्तीकराच्या कलम 80 सी (Income Tax 80 C) अंतर्गत आयुर्विमा, पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी, बँक, पोस्ट ऑफीस ठेव योजना, एनपीएस,युलिप, ट्यूशन फीस, ईएलएसएस यासाठी कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर कर सवलत घेता येते. 80 सीसीडी (1B): या कलमाअंतर्गत एनपीएसच्या टियर-1 खात्यात 50 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यावरही 80 सीसीडी (1) अंतर्गत असणाऱ्या गुंतवणूक मर्यादेव्यतिरिक्त करसवलत मिळते. त्यामुळे एका आर्थिक वर्षात एनपीएसद्वारे कमाल 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. तुम्ही 80 सी आणि 80 सीसीसी अंतर्गत 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तरीही 80 सीसीडी (1B)अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपयांच्या गुंतवणूकीवर कर सवलत मिळवू शकता. 80 सीसीडी (2): या कलमाअंतर्गत एनपीएसच्या टियर-1 खात्यात करण्यात आलेल्या गुंतवणूकीवर कर वजावट मिळण्याची तरतूद आहे. मात्र कर सवलतीचा लाभ मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून होणाऱ्या वार्षिक पगाराच्या दहा टक्के रकमेवरच मिळेल. हेही वाचा-  SBI Gold Deposit Scheme: घरातील ठेवलेल्या सोन्यातून करा कमाई, एसबीआय देतंय संधी कर सवलत : एनपीएस ही योजनादेखील पीपीएफ, ईपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणे तिहेरी सवलतीच्या गटात मोडते. या योजनेतही केलेली गुंतवणूक, काढलेली रक्कम आणि मिळणारे व्याज करमुक्त आहे. एनपीएसमध्ये 60 टक्के रक्कम काढता येते. त्यावर कर सवलत मिळते. एनपीएसमधील 40 टक्के गुंतवणूक अॅन्युईटीसाठी गुंतवावी लागते. अॅन्युईटीची रक्कम करमुक्त आहे पण त्यावर मिळणारी नियमित दरमहा पेन्शनची रक्कम करमुक्त नाही. ही रक्कम तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरली जाते आणि त्यावर कर द्यावा लागतो. काढून घेतलेल्या रकमेवर कर आकारणी : या योजनेतील गुंतवणूकीला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच काही रक्कम काढता येते. तुम्ही ज्या दिवशी काही रक्कम काढण्यासाठी अर्ज करता त्या दिवसापर्यंत जितकी रक्कम खात्यात साठली असेल त्याच्या 25 टक्के रक्कम काढता येते. यामध्ये संस्थेनं किंवा कंपनीनं दिलेल्या योगदानाची रक्कम गृहीत धरली जात नाही. मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून होणाऱ्या वार्षिक पगाराच्या दहा टक्के रक्कमच गुंतवता येते. काही प्रमाणात काढलेली रक्कम पूर्णतः करमुक्त असते.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Money, Tax

पुढील बातम्या