Income Tax Alert : नोकरदारांसाठी महत्त्वाचं! Form 16 मध्ये झाला हा बदल

Income Tax Alert : नोकरदारांसाठी महत्त्वाचं! Form 16 मध्ये झाला हा बदल

इनकम टॅक्स रिटर्न Income Tax Return फाईल करायची अंतिम तारीख 31 जुलै 2019 आहे. त्यासाठी महत्त्वाचा असतो Form 16. हा फॉर्म मिळायला यंदा उशीर होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 5 जून : इनकम टॅक्स रिटर्न Income Tax Return फाईल करायची अंतिम तारीख 31 जुलै 2019 आहे. पण या वर्षी आयकर भरण्यासाठी थोडी अडचण येऊ शकते. CBDT ने  फॉर्म 16  जारी करण्याची शेवटची मुदत वाढवली आहे.

2018 - 19 या आर्थिक वर्षासाठी फॉर्म 24Q फाइल करण्याची शेवटती तारीखसुद्धा वाढवण्यात आली आहे. फॉर्म 24Q म्हणजेच TDS रिटर्न भरण्याची तारीख 31 मे असते. ती वाढवून आता 20 जून 2019 करण्यात आली आहे. फॉर्म 16 जारी करण्याची तारीखही त्यामुळे वाढली आहे.  आता 10 जुलै 2019 पर्यंत फॉर्म 16 जारी केला तरी चालू शकेल.

फॉर्म 16 का महत्त्वाचा?

नोकरदारांसाठी फॉर्म 16 चं महत्त्व मोठं आहे. इन्कम टॅक्स भरण्यासाठी सर्व नोकरदारांना या फॉर्मचा आधार घ्यावा लागतो. तुम्ही नोकरी करता त्या कंपनीने तुमच्या पगारातून TDS अर्थात आयकर कापून मग तुमच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. या फॉर्ममध्ये आयकरासंदर्भात सगळी आकडेवारी दिलेली असते, जी वैयक्तिक आयकर रिटर्न फाईल करताना महत्त्वाची ठरते. फॉर्म 16 असल्याशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरणं मुश्कील असतं.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

कंपनीने द्यायच्या फॉर्म 16 मध्ये एक B पार्ट असतो. यामध्ये TDS सर्टिफिकेटची माहिती भरावी लादते. या भागातली माहिती काटेकोर करण्यावर या वर्षी भर असेल. त्यामुळे यासाठी वेळ देण्यात आली आहे.

जागतिक पर्यावरण दिन : आपल्याच सवयींमुळे दरवर्षी जातोय 1 लाख मुलांचा बळी

तुमची टॅक्स भरण्याची मुदतही यामुळे वाढू शकते. अद्याप यासंर्भात आयकर विभागाने कोणतीही घोषणा केलेली नाही. पण 10 जुलैला फॉर्म 16 मिळाला तर सर्व नोकरदार 31 जुलैच्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतील अशी शक्यता वाटत नाही.

शौचालयाच्या टाईल्सवर महात्मा गांधींचा फोटो, VIDEO व्हायरल

First published: June 5, 2019, 6:19 PM IST
Tags: Income tax

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading