मराठी बातम्या /बातम्या /मनी /Tata चे पाच शेअर ठरले मल्टिबॅगर; गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Tata चे पाच शेअर ठरले मल्टिबॅगर; गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

चांगले रिटर्न देणाऱ्या मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये टाटा कंपनीचे काही शेअर्स आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वरील मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीमध्ये, टाटाचे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी शेअरधारकांना जवळपास दुप्पट रिटर्न दिलाय.

चांगले रिटर्न देणाऱ्या मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये टाटा कंपनीचे काही शेअर्स आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वरील मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीमध्ये, टाटाचे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी शेअरधारकांना जवळपास दुप्पट रिटर्न दिलाय.

चांगले रिटर्न देणाऱ्या मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये टाटा कंपनीचे काही शेअर्स आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वरील मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीमध्ये, टाटाचे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी शेअरधारकांना जवळपास दुप्पट रिटर्न दिलाय.

    मुंबई, 28 डिसेंबर : भारतीय शेअर बाजाराने ( Indian stock markets ) यावर्षी विविध आव्हानांचा सामना करताना विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराच्या या तेजीमध्ये जवळपास सर्वच स्टॉकनी चांगले रिटर्न दिले. काही स्टॉक्स तर जबरदस्त रिटर्न देत आहेत. विशेषत: मल्टिबॅगर (Multibagger) शेअर्समध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला. चांगले रिटर्न देणाऱ्या मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये टाटा कंपनीचे काही शेअर्स आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वरील मल्टिबॅगर शेअर्सच्या यादीमध्ये, टाटाचे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी शेअरधारकांना जवळपास दुप्पट रिटर्न दिलाय.

    टाटा पॉवर

    टाटा पॉवर (Tata Power) कंपनीचा शेअर सध्या 217 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. वर्षभरापूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर 2020 रोजी हा स्टॉक 77 रुपयांवर (Stock Price) ट्रेड करत होता. वर्षभरात तो 77 रुपयांवरून 217 रुपयांवर पोहोचला. एका वर्षात हा शेअर 188 टक्क्यांनी वाढला आहे. 18 ऑक्टोबरला हा शेअर 257 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या 6 महिन्यांचा विचार केल्यास या भारतीय इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनीने त्यांच्या भागधारकांना सुमारे 75 टक्के परतावा दिला.

    Income Tax ची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील 'हे' व्यवहार तर येईल नोटीस; वाचा नियम

    टाटा मोटर्स

    टाटा पॉवर व्यतिरिक्त टाटा मोटर्स (Tata Motors) चांगले रिटर्न्स देणारा स्टॉक ठरलाय. हा शेअर सध्या 472.45 रुपयांवर ट्रेड करत आहे. एका वर्षापूर्वी तो 186 रुपयांवर ट्रेड करत होता. याचाच अर्थ या शेअरधारकांना सुमारे 150 टक्के रिटर्न मिळाला आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये तो 530.15 रुपयांवर पोहोचला होता.

    टाटा एलेक्सी

    टाटा एलेक्सी (Tata Elxi) ही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी आहे. सध्या तिचा स्टॉक हा 5452 रुपयांवर आहे. बरोबर एक वर्षापूर्वी या शेअरची किंमत 1870 रुपये होती. एका वर्षाच्या आत ती 5,452 रुपयांवर पोहोचली आहे. वर्षभरात शेअरच्या किंमतीमध्ये 190 टक्के वाढ दिसत आहे. या शेअरच्या किंमतीने नोव्हेंबरमध्ये 6600 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

    नेल्को

    टाटा समूहाची कंपनी नाल्कोचा (Nelco) स्टॉक वर्षभरात 200 रुपयांवरून 720 रुपयांपर्यंत वाढला आहे. 2021 मध्ये या स्टॉकमध्ये सुमारे 260 टक्के वाढ झाली. या मल्टिबॅगर स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत त्याच्या शेअरधारकांना सुमारे 120 टक्के परतावा दिलाय. या शेअरने 19 ऑक्टोबर रोजी 960.10 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर त्यात घसरण दिसून आली.

    यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर

    टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड

    टाटा टेलिसर्व्हिसेस (Tata Teleservices Maharashtra Ltd) या कंपनीच्या शेअरची किंमत वर्षभरापूर्वी 8 रुपयांपेक्षा कमी होती. पण आज हा शेअर 169.85 रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षात या शेअरमध्ये 2000 टक्क्यांहून जास्त वाढ झाली. 17 डिसेंबर 2021 रोजी तो एनएसईवर 189.10 रुपयांवर पोहोचला होता.

    First published:
    top videos

      Tags: Share market, Tata group