मुंबई, 29 जानेवारी : ग्राहकांच्या गरजा आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन नेहमीच विविध प्रॉडक्ट्स घेऊन येणाऱ्या टाटा मोटर्सने कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलीटीमधील ‘Nexon’ ही इलेक्ट्रिक SUV भारतात लाँच केली आहे. या कारची किंमत 13.99 लाख रुपयांपासून 15.99 लाखांपर्यंत आहे. ही कार खिशाला परवडणारी आहे कारण डॉउन पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना 1 ते 4 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. TATA Tigor EV नंतर लॉन्च झालेली 'Nexon' हे असं भन्नाट मॉडेल आहे जे ह्युंदाई कोना EV आणि MG ZS EV या इलेक्ट्रिक वाहनांना टक्कर देऊ शकेल. ‘Nexon’ पुढील 3 मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे- XM, XZ PLUS आणि XZ Lux.
वाचा- विकेंण्डला बँकेचा संप, ATMमध्ये खडखडाट होण्याची शक्यता
टाटा समूहाच्याच असणाऱ्या झिपट्रॉन टेक्नॉलॉजीचा वापर या कारमध्ये करण्यात आला आहे. या SUVमध्ये 245 न्यूटन मीटर इन्स्टंट टार्क असून 10 सेकंदापेक्षा कमी वेळात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता आहे. आठ वर्षांच्या वॉरंटीसह येणारी मोटर, हाय व्होल्टेज सिस्टिम, वेगवान चार्जिंगची क्षमता, सर्वोत्तम बॅटरी ही या कारची वैशिष्ट्य आहेत. तसंच आयपी 67 (डस्ट आणि वाटर प्रूफ) च्या मानांकनाचं पालन करणारी ही कार आहे. नेक्सॉनच्या बेसिक व्हेरिअंट XM मध्ये फुल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 2 ड्राइव्ह मोड, की-लेस एंट्री, पुश बटण स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अॅप आणि फ्रंट-रिअर पावर विंडो यांसारख्या फीचर्समुळेच ही कार विशेष आहे.
वाचा- BUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
भारतातील 22 शहरांच्या 60 आउटलेट्समध्ये ‘निक्सॉन’ उबलब्ध असणार आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देण्यासाठी टाटा सब्सक्रिब्शनच्या आधारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ‘निक्सॉन’च्या माध्यमातून करत आहे. यामध्ये 1 ते 4 वर्षांच्या काळासाठी ग्राहकांनी डाऊन पेमेंट न करण्याची सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स आणखी 4 इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये दोन SUV, एक हॅचबॅक आणि एका सेदानचा समावेश आहे. येत्या 2 वर्षात या कार्सचं लॉन्च टाटा समुहाकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती टाटा समुहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी ‘निक्सॉन’च्या लाँचवेळी सांगितलं.