मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये खासगी चारचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक कार निर्मिती कंपन्यांनी बाजारामध्ये आपल्या नवनवीन गाड्या उतरवल्या आहेत. सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक अत्याधुनिक गाड्या उपलब्ध आहेत.
टाटा कंपनीची 'टाटा नेक्सॉन' ही गाडी तर देशातील सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्ही कार ठरली आहे. कंपनीच्या वैयक्तिक कामगिरीचा विचार केला तर, ही कार सर्वाधिक विक्री होणारी कारदेखील आहे. या एसयूव्हीमध्ये पेट्रोलसोबत डिझेल इंजिनचा पर्यायही मिळतो. या गाडीची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, तुम्ही फक्त 90 हजार रुपये भरून ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता.
टाटा नेक्सॉन ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. तिची शोरूम किंमत (दिल्ली) 7.80 लाख ते 14.35 लाख रुपयांदरम्यान आहे. ही गाडी एकूण आठ ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. एक्सई, एक्सएम, एक्सएम(S), एक्सएम प्लस (S), एक्सझेड प्ल्स, एक्सझेड प्लस (HS), एक्सझेड प्लस (L) आणि एक्सझेड प्लस (P) अशा ट्रिम्समध्ये उपलब्ध असलेल्या या गाडीत जास्तीत जास्त पाच व्यक्ती बसू शकतात. पूर्ण पैसे देऊन ही कार खरेदी करण्यासाठी तुमचं बजेट नसेल, तर तुम्ही लोनच्या माध्यमातून गाडी खरेदी करू शकता.
90 हजार रुपयांमध्ये कशी मिळेल गाडी?
जर तुम्ही या कारचं बेस व्हेरिएंट मॉडेल खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला 8.85 लाख रुपये मोजावे लागतील. आता आपण असं गृहीत धरू की, लोन घेऊन ही कार खरेदी करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त रक्कमेचं डाउन पेमेंट देऊ शकता. वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळा असतो आणि कर्जाचा कालावधी एक वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंतही निवडता येतो. उदाहरणार्थ, 10 टक्के डाउन पेमेंट, 9.8 टक्के व्याज दर आणि पाच वर्षांचा कर्जाचा कालावधी आपण गृहीत धरू. अशा परिस्थितीत, तुम्हाला दरमहा 16 हजार 845 रुपये ईएमआय भरावा लागेल. तुम्हाला कर्जाच्या एकूण रकमेच्या (7.96 लाख रुपये) बदल्यात 2.14 लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
टाटा नेक्सॉनची फीचर
या टाटा एसयूव्हीमध्ये सात इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉईस कमांड, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर यांसारखी अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत. टॉप-स्पेक ट्रिममध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, आठ-स्पीकर साउंड सिस्टीम आणि एअर क्वालिटी डिस्प्लेसह एअर प्युरिफायरदेखील मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.