Home /News /money /

Tata Neu App Launched: IPL सामन्यांदरम्यानच्या 'कुछ दिनो में क्यो?'चं उत्तर मिळालं

Tata Neu App Launched: IPL सामन्यांदरम्यानच्या 'कुछ दिनो में क्यो?'चं उत्तर मिळालं

टाटाचे हे अॅप Jio, Amazon, Flipkart, Paytm, MobiKwik आणि Google सारख्या कंपन्यांना आव्हान देऊ शकते. टाटा ग्रुपचे बराच काळ यावर काम सुरु होते.

    मुंबई, 7 एप्रिल : टाटा समूहाने (Tata Group) अधिकृतपणे त्यांचे बहुप्रतिक्षित सुपर अॅप Tata Neu लाँच केले आहे. हे एक प्रकारचे ऑल-इन-वन अॅप आहे. या अॅपला टाटा न्यू अॅप (Tata Neu App) असे नाव देण्यात आले आहे. आता त्याचे पेज गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) लाइव्ह असेल. या अॅपद्वारे युजर्स शॉपिंग आणि सर्व प्रकारचे पेमेंटही करू शकतील. टाटा समूह याद्वारे डिजिटल जगतात मोठा धमाका करेल, असा विश्वास आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन याबाबत म्हटलं की, आमचे उद्दिष्ट भारतीयांचे जीवन सरळ आणि सोपे बनवणे आहे. लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये चंद्रशेखरन म्हणाले की विस्तारा, एअर इंडिया, टायटन, तनिष्क आणि टाटा मोटर्स सारखे ब्रँड देखील अॅपवर लवकरच उपलब्ध होतील. कोणत्या कंपन्यांसोबत असणार स्पर्धा? टाटाचे हे अॅप Jio, Amazon, Flipkart, Paytm, MobiKwik आणि Google सारख्या कंपन्यांना आव्हान देऊ शकते. टाटा ग्रुपचे बराच काळ यावर काम सुरु होते. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की Tata Neu 'सुपर अॅप' म्हणून काम करेल. याच्या मदतीने यूजल त्यांचे दैनंदिन किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स शॉपिंग ते फ्लाइट आणि हॉलिडे बुकिंग करू शकतील. Tata Neu अॅपमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? याद्वारे एअर एशिया इंडिया, विस्तारा, एअर इंडिया किंवा ताज ग्रुप हॉटेल्सवर फ्लाइटची तिकिटे बुक करता येतील. बिगबास्केटवरून किराणा सामानाची ऑर्डर करता येईल. 1mg वरून औषधे ऑर्डर करता येतील. क्रोमावरून इलेक्ट्रॉनिक्स खरेदी, टाटा प्लेसाठी रिचार्च आणि बरेच काही यावरुन करता येईल. वेस्टसाइडवरून कपडे खरेदी करणेही या अॅपवरुन शक्य होईल. मोबाईल आणि डीटीएच रिचार्जही शक्य या अॅपद्वारे, यूजर्स मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज व्यतिरिक्त त्यांचे वीज बिलही भरू शकतात. या सुपर अॅपवर तुम्हाला पेमेंट आणि मनी ट्रान्सफरसाठी Tata Pay UPI चा पर्याय मिळेल. या सुविधेद्वारे, यूजर्स मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना पैसे पाठवू शकतात. तुम्हाला अॅपमध्ये UPI आणि EMI ऑफरचा पर्याय देखील मिळेल. रिवॉर्ड्स देखील मिळतील या अॅपद्वारे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनी NeuCoins रिवॉर्ड पॉइंट्स देखील देईल. कंपनी म्हणते की Tata Neu वरील प्रत्येक ब्रँड NeuCoins नावाच्या सामान्य रिवॉर्ड्सशी जोडलेला आहे. टाटा डिजिटलच्या वेबसाइटनुसार, हे अॅप या आठवड्यात अँड्रॉइड तसेच iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या हे अॅप फक्त टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी होते, पण लॉन्च झाल्यानंतर आता ते इतर यूजर्ससाठीही उपलब्ध केले जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Online shopping, Tata group

    पुढील बातम्या