Home /News /money /

Rakesh Jhunjhunwala यांची कमाल; Tata Motors DVR मध्ये गुंतवणूक वाढनताच शेअर्स 10 टक्क्यांनी वधारले

Rakesh Jhunjhunwala यांची कमाल; Tata Motors DVR मध्ये गुंतवणूक वाढनताच शेअर्स 10 टक्क्यांनी वधारले

Rakesh Jhunjhunwala यांनी सप्टेंबर तिमाहीत Tata Motors DVR मधील आपला हिस्सा जून तिमाहीतील 1.97 टक्क्यांवरून 3.93 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी टाटा मोटर्स डीव्हीआरमधील (Tata Motors DVR) आपली हिस्सेदारी वाढवल्यानंतर, 21 ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांनी वाढून 255.55 रुपयांवर बंद झाली. राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टाटा मोटर्स डीव्हीआरमधील आपला हिस्सा जून तिमाहीतील 1.97 टक्क्यांवरून 3.93 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे विदेशी पोर्टफोलिओ इन्वेस्टरमधील (Foreign portfolio investor) व्हॅनगार्ड इमर्जिंग मार्केट्स स्टॉक इंडेक्स फंडने (Vanguard Emerging Markets Stock Index Fund) कंपनीतील आपला हिस्सा 4.58 टक्क्यांवरून 4.68 टक्के केला आहे. दरम्यान, सप्टेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील आपला हिस्सा किरकोळ घटवून 1.11 टक्क्यांवर आणला आहे. याआधी त्यांची भागिदारी 11.4 टक्के होती. Rakesh Jhujhunwala यांनी आपल्या आवडत्या कंपनीत गुंतवणूक वाढवली, यावर्षी कंपनीकडून 60 रिटर्न्स वेव्स स्ट्रॅटेजी अॅडव्हायझर्सचे (Waves Strategy Advisors) संस्थापक आशिष क्याल यांनी म्हटलं की, जर आम्ही टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआरच्या किंमतीच्या चार्टची तुलना केली तर असे दिसते की टाटा मोटर्स डीव्हीआर येथून पुढे जाईल. आनंद राठी शेअर्स आणि स्टॉक ब्रोकर्सचे (Anand Rathi Shares & Stock Brokers) मेहुल कोठारी म्हणाले की, टाटा मोटर्स विरुद्ध टाटा मोटर्स डीव्हीआरच्या रेशोचा चार्ट पाहता असे दिसते की टाटा मोटर्स डीव्हीआर यावेळी टाटा मोटर्सला तात्पुरते मागे टाकू शकतो. 'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी मोतीलाल ओसवालच्या (Motilal Oswal) अहवालानुसार, कमी झालेल्या वोटिंग हक्कांची भरपाई करण्यासाठी या डीव्हीआर शेअर्सना 10-20 टक्के लाभांश प्रीमियम दिला जातो. लहान आणि किरकोळ भागधारकांसाठी हे ठीक आहे कारण ते मतदान प्रक्रियेत भाग घेत नाहीत. जास्त लाभांशासाठी तुमच्या मताधिकारांचा एक भाग देणे या भागधारकांसाठी चांगले मानले जाते. टाटा मोटर्स कंपनीत सुमारे 3,77,50,000 शेअर्स  राकेश झुनझुनवाला यांचे टाटा मोटर्स कंपनीत सुमारे 3,77,50,000 शेअर्स किंवा 1.14 टक्के हिस्सा आहे. 2021 मध्ये टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 290 रुपयांवरून 477 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Share market, Tata group

    पुढील बातम्या