मुंबई, 28 डिसेंबर : ट्रेंट लिमिटेड (Trent Limited) ही टाटा समूहातील (Tata Group) एक कंपनी आहे. ही भारतातील ऑर्गनाईज रिटेल क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने Trent Limited ची आठवड्यातील टॉप स्टॉक पिक्सपैकी एक म्हणून निवड केली आहे. Axis Securities ला विश्वास आहे की कंपनीची रिकव्हरी आर्थिक वर्ष 2022 च्या उत्तरार्धातही सुरू राहील.
विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत ट्रेंटच्या फॅशन व्यवसायात जोरदार सुधारणा झाली आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर कंपनी आर्थिक वर्ष 2022 च्या उत्तरार्धात चांगली कामगिरी करत राहील. यामुळे कंपनी कोरोनाच्या प्रभावातून सावरताना नफ्यात परतताना दिसेल.
Income Tax Return: जर 4 दिवसात पूर्ण नाही केलं हे काम तर भरावा लागेल भरभक्कम दंड, वाचा सविस्तर
Axis Securities ने टाटा ग्रुप कंपनीच्या या स्टॉकवर BUY कॉल दिला आहे ज्याचे टार्गेट 1180 रुपये आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या स्टॉकमधील सर्वोत्तम गुंतवणुकीचा कालावधी 6-9 महिन्यांचा असेल, परंतु जर शॉर्ट टर्मच्या गुंतवणूकदारांनाही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते करु शकतात. शॉर्ट टर्ममध्येही तेजी दिसून येईल.
महाराष्ट्रात काय आहेत इंधनाचे दर, एका क्लिकवर वाचा पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट भाव
ट्रेंटच्या व्यवस्थापनाने (Trent Management) सांगितले आहे की ते त्यांच्या Zudio फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की Zudio फॉरमॅट हा एक वॅल्यू फॅशन सेगमेंट आहे जो 15-25 वयोगटातील लोकांना टार्गेट करतो. Zudio या वयोगटासाठी परवडणाऱ्या किमतीत ट्रेंडी उत्पादनांची परवडणाऱ्या किमतीत विक्री करते. कंपनीसाठी हा एक अतिशय फायदेशीर फारमॅट आहे. याशिवाय, कंपनीचे व्यवस्थापन भाड्यासह इतर खर्चात कपात करण्यावर भर देत आहे. यामुळे कंपनीचा नफा आणि मार्जिन आणखी सुधारेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market, Tata group