• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Upcoming IPO : या आठवड्यात कमाईची पुन्हा संधी; दोन कंपन्यांचे IPO ओपन होणार

Upcoming IPO : या आठवड्यात कमाईची पुन्हा संधी; दोन कंपन्यांचे IPO ओपन होणार

या महिन्यात आतापर्यंत Paytm ची मूळ कंपनी One97 Communications, Sapphire Foods India Ltd, Latent View Analytics, Nykaa, PB Fintech, Fino payment Bank, SJS Enterprises आणि Sigachi या कपन्यांचे IPO यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर : या महिन्यात बरेच IPO लिस्ट झाले आहेत. आता पुन्हा या आठवड्यातही दोन आयपीओ लिस्ट होण्याच्या तयारीत आहेत. टारसन्स प्रॉडक्ट्स (Tarsons Products) आणि गो फॅशन (इंडिया) लिमिटेड (Go Fashion India pvt ltd) या दोन कंपन्यांचे Initial Public Offer (IPO) पुढील आठवड्यात येतील. एकूण 2,038 कोटींहून अधिकची रक्कम उभारण्याची अपेक्षा आहे. Tarsons Products चा तीन दिवसीय IPO 15 नोव्हेंबरला उघडेल आणि 17 नोव्हेंबरला बंद होईल. तर गो फॅशनचा आयपीओ ज्यांचा गो कलर्स ब्रँड आहे तो 17 नोव्हेंबरला उघडेल आणि 22 नोव्हेंबरला बंद होईल. या महिन्याच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातील आठ कंपन्यांचे आयपीओ यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. यामध्ये Paytm ची मूळ कंपनी One97 Communications, Sapphire Foods India Ltd, Latent View Analytics, Nykaa, PB Fintech, Fino payment Bank, SJS Enterprises आणि Sigachi यांचा समावेश आहे. SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस? वर्षभरात आतापर्यंत 49 कंपन्यांचे आयपीओ आले स्टॉक मार्केट डेटाच्या विश्लेषणानुसार, या वर्षात 2021 मध्ये आतापर्यंत 49 कंपन्यांनी IPO च्या माध्यमातून 1.01 लाख कोटी रुपये उभारण्यात यश मिळवलंय. या व्यतिरिक्त, पॉवरग्रिड कॉर्पोरेशनच्या पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट POWERGRID InvIT ने देखील IPO द्वारे 7,735 कोटी रुपये उभारले आहेत. ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टनेही शेअर्सच्या विक्रीतून 3,800 कोटी रुपये उभे केले आहेत. गेल्या वर्षी 26611 कोटींचा आयपीओ आला होता संपूर्ण वर्ष 2020 च्या तुलनेत यावर्षी IPO मार्केटची कामगिरी चांगली राहिली आहे. गेल्या वर्षभरात 15 कंपन्यांनी IPO मधून केवळ 26,611 कोटी रुपये उभे केले होते. राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण  Paytm चा 18,300 कोटींचा IPO सेबीच्या मंजुरीनंतर पेटीएम मंगळवारी शेअर्सचे वाटप करेल असे एका सूत्राने सांगितले. SEBI ची मंजुरी सोमवारी अपेक्षित आहे. 18300 कोटी रुपयांच्या Paytm IPO ला बोलींच्या आधारावर 1,49,428 कोटीच्या उपक्रम मूल्यावर लिस्टिंग होईल. देशातील सर्वात मोठा IPO 1.89 पट सबस्क्राईब झाला आहे. संस्थात्मक खरेदीदार (Industrial Buyers) श्रेणीमध्ये IPO 2.79 पट सबस्क्राईब झाला. दुसरीकडे, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Invetors) राखीव असलेल्या 87 लाख शेअर्सवर 1.66 पट बोली प्राप्त झाली.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: