• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Tarson Products IPO ची ग्रे मार्केट किंमत किती? शेअर अलॉटमेंट कसं चेक कराल?

Tarson Products IPO ची ग्रे मार्केट किंमत किती? शेअर अलॉटमेंट कसं चेक कराल?

Tarson Products कंपनीचा IPO 15 नोव्हेंबर रोजी उघडला आणि 17 नोव्हेंबर रोजी बंद झाला. कंपनीच्या IPO मध्ये, 150 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 1,32,00,000 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये (OFS) विकले गेले.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : Tarson Products कंपनीच्या शेअर्सचे अलॉटमेंट 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कंपनीने 1023.47 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला होता. कंपनीचा IPO 15 नोव्हेंबर रोजी उघडला आणि 17 नोव्हेंबर रोजी बंद झाला. कंपनीच्या IPO मध्ये, 150 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 1,32,00,000 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये (OFS) विकले गेले. टार्सन प्रोडक्ट्सचा इश्यू 77.49 वेळा सबस्क्राईब झाला. Non Institutional Investors श्रेणीतील सबस्क्रिप्शन 184.58 पट होते. दुसरीकडे, Qualified Institutional Buyer साठी राखीव भाग 115.77 वेळा बुक केला गेला. तर Retail Investors नी त्यांच्या शेअरच्या 10.56 पट बोली लावली होती. IPO च्या चांगल्या मागणीमुळे, ग्रे मार्केटमध्ये टार्सन प्रॉडक्ट्सच्या (Tarson Products GMP) अनलिस्टेड शेअर्सचा प्रीमियम 210 रुपये आहे. टार्सन प्रोडक्टची इश्यू किंमत 635-662 रुपये आहे. नवीनतम ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) नुसार, टार्सन प्रोडक्ट्सच्या शेअर्सची लिस्टिंग 872 रुपये (662 + 210) मध्ये केली जाऊ शकते. घरी आहे लगीनघाई तर स्वस्तात करा सोनेखरेदी! 3000 रुपयांनी कमी आहे सोन टार्सन प्रोडक्ट्सचा GMP एका दिवसापूर्वी 240 रुपये होता पण 19 नोव्हेंबरला तो 30 रुपयांनी घसरून 210 रुपयांवर आला आहे. जर तुम्ही टार्सन प्रॉडक्ट्सच्या IPO मध्ये गुंतवणूक केली असेल, तर 23 नोव्हेंबर रोजी बीएसई आणि तिच्या रजिस्ट्रार कंपनीच्या वेबसाइटवर Allotment Status तपासू शकता. त्याची रजिस्ट्रार कंपनी KFintech प्रायव्हेट लिमिटेड आहे. BSE द्वारे स्टेटस तपासण्यासाठी काय कराल? >> सर्वात आधी https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर क्लिक करा. >> या लिंकवर क्लिक केल्यानंतर Status of Issue Application पेज उघडेल. त्यावर इक्विटी पर्याय निवडा. >> ज्या कंपनीसाठी तुम्हाला IPO चे वाटप तपासायचे आहे त्या कंपनीचे नाव निवडा. >> त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका. >> याच्या खाली तुम्हाला तुमच्या पॅनचा तपशील द्यावा लागेल. >> यानंतर, I am not a robot च्या बॉक्सवर क्लिक करून तुमची पडताळणी करा. >> यानंतर सर्च बटण दाबा आणि स्टेटस तुमच्या समोर येईल. Paytm च्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पहिल्या दिवशी निराश; पुढे काय करायचं रजिस्ट्रार कंपनी KFintech Private Limited मार्फत अलॉटमेंट चेक करा >> सर्वप्रथम https://ris.kfintech.com/iposatus/ या लिंकवर क्लिक करा. >> त्यानंतर लिंक 1 वर क्लिक करा जे तुम्हाला IPO Alotment च्या पेजवर घेऊन जाईल. >> ड्रॉपबॉक्समध्ये आयपीओचे नाव निवडा ज्याचं अलॉटमेंट स्टेटस तपासायचे आहे. >> या खाली तुम्ही अर्ज क्रमांक, क्लाईंट आयडी, पॅन या तीनपैकी कोणतीही एक माहिती देऊन स्टेटस तपासू शकता. >> त्यानंतर तुमच्या अर्जाचा प्रकार निवडा. म्हणजेच, ASBA किंवा Non-ASBA यापैकी एक निवडा. >> तुम्ही जो मोड निवडाल त्यानुसार तुम्हाला त्याखाली माहिती द्यावी लागेल. >> त्यानंतर कॅप्चा भरा आणि सबमिट करा. >> अलॉटमेंट स्टेटस तुमच्या समोर उघडेल. टार्सन प्रॉडक्ट्सच्या शेअर्सचे अलॉटमेंट 23 नोव्हेंबरला होणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत ज्या लोकांना त्याचे शेअर्स मिळतील त्यांच्या डीमॅट खात्यात शेअर्स दिसू लागतील. ज्यांना हे शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे 24 नोव्हेंबरपर्यंत परत केले जातील. शेअर्सची लिस्टिंग 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: