#BoyCottTanishqने सोशल मीडियावर वातावरण तापलं; Love Jihadचा आरोप झाल्यानं मागे घेतली जाहिरात

#BoyCottTanishqने सोशल मीडियावर वातावरण तापलं; Love Jihadचा आरोप झाल्यानं मागे घेतली जाहिरात

ज्वेलरी ब्रँड 'तनिष्क' (Tanishq)ची जाहिरात गोत्यात आली आहे. या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर सध्या #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लोकांचा वाढता विरोध बघता तनिष्कने यूट्यूबवरुन ही जाहिरात काढून टाकली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर: लोकप्रिय ज्वेलरी ब्रँड असलेल्या 'तनिष्क' (Tanishq)ची नवी जाहिरात गोत्यात आली आहे. तनिष्कच्या नव्या जाहिरातीवर लव्ह जिहाद (Love Jihad)ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ट्विटरवर सध्या #BoycottTanishq हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. या घटनेची गंभीर दखल 'तनिष्क'कडून घेण्यात आली. या जाहिरातीचं प्रसारण सध्या बंद करण्यात आलं आहे. 'तनिष्क'ने आपला ब्रँट प्रमोट करण्यासाठी ही नवी जाहिरात तयार केली होती. पण लोकांचा विरोध बघता ही जाहिरात बंद करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये हिंदू मुलगी मुस्लीम मुलाशी लग्न (Interfaith Marriage) करत आहे असं दाखवण्यात आलं आहे.

तनिष्कच्या या जाहिरातीमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, हिंदू मुलीचं मुस्लीम मुलाशी लग्न झालेलं असतं. तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सुरू असतो. मुस्लीम मुलाचं कुटुंब हिंदू पद्धतीप्रमाणे तिचं डोहाळेजेवण करतं. तेव्हा हिंदू मुलगी आपल्या सासूला विचारते की, "सासूबाई तुमच्या घरात ही परंपरा नाही. मग तुम्हीच हे का करत आहात. तेव्हा तिची सासू तिला उत्तर देते की, पण मुलीला खुश ठेवण्याची परंपरा प्रत्येक घरात असतेच ना". ही जाहिरात बघितल्यानंतर त्यावर लव्ह जिहादला (Love Jihad) पाठिंबा देणारी जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. ट्विटरवर #BoyCottTanishq असा ट्रेंड सुरू झाला. त्यामुळे तनिष्कने हा व्हिडीओ यूट्यूब (Youtube)वरुन काढून टाकला आहे.

सोशल मीडियावर वातावरण तापलं

सोशल मीडियावर सध्या या जाहिरातीमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. "प्रत्येक वेळी हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा असं समीकरण का दाखवलं जातं?" असा सवाल काही लोक सोशल मीडियावर विचारत आहेत. "तनिष्कचे दागिने घेऊ नका" असे सल्लेही देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांनी तनिष्कच्या जाहिरातीला पाठिंबा दिला आहे. तनिष्कच्या जाहिरातीवर तोशेरे ओढणाऱ्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी टीका केली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 13, 2020, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading