बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घेण्याचा विचार करताय? आधी वाचा त्याचे फायदे आणि तोटे

बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घेण्याचा विचार करताय? आधी वाचा त्याचे फायदे आणि तोटे

अडीनडीच्या काळात बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घेण्याचा उपाय सुचवला जातो तो फायद्याचा की तोट्याचा?

  • Share this:

मुंबई,02 ऑक्टोबर : संकटाच्या काळात त्वरीत पैशाची गरज आपल्यापैकी अनेकांना भासते. कोरोना काळात तर अनेकांचे रोजगार गेल्यामुळे कर्ज काढण्याची वेळ आपल्यापैकी बऱ्याच जणांवर येत आहे. अशावेळी कर्ज काढण्यासाठी बँकेत गेल्यावर सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेण्याचा सल्ला दिला जातो. घाई गडबडीत आपण हा पर्याय स्वीकारतो आणि नंतर त्याचे वाईट परिणाम सहन करावे लागतात.

सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेतल्यानंतर लॉकरचं भाडं माफ केलं जातं पण कर्ज घेतल्यामुळे 9.5 टक्के व्याज भरावं लागतं. बँकेच्या लॉकरवर गोल्ड लोन घेण्यासाठी ओवरड्राफ्ट सुविधा दिली जात नाही. सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेण्याचं आमिष अनेकदा गरजवंताना दाखवलं जातं. पण हे अयोग्य आहे. एरवी बँकेच्या लॉकरसाठी खातेदाराला वर्षातून एकदा पैसे भरावे लागतात. पण जर आपण सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेतलं तर आपल्याकडून दामदुपटीने पैसे घेतले जातात. त्यामुळे पैशांअभावी आपण लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर लोन घ्यायचं ठरवलं तर त्याचं नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरते.

हे ही वाचा-ATM संदर्भातील ही 3 कामं आजच करा पूर्ण, नेहमी सुरक्षित राहतील तुमचे पैसे

जेव्हा बँक तुमच्या लॉकरमधील सोन्यावर कर्ज देते तेव्हा त्या सोन्याच्या शुद्धतेचं परीक्षणही केलं जातं. तसंच सोन्याच्या लॉकरवर कर्ज घेतल्यास प्रत्येक महिन्याला हफ्ता भरावा लागतो. आणि हा हफ्ता आपण चुकवला तर आपल्या क्रेडिट हिस्ट्रीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या सोन्यावर कर्ज काढा पण पूर्ण विचार करुनच !

Published by: Amruta Abhyankar
First published: October 2, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या