नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : टॅक्स भरणाऱ्यांना इनकम टॅक्स विभागाने पॅन नंबरच्या ऐवजी 12 आकडी आधार नंबर वापरण्याची परवानगी दिली आहे. पण जर तुम्हाला हा नंबर वापरायचा असेल तर खबरदारी घेण्याची गरज आहे. तुम्ही जर चुकीचा आधार नंबर दिला तर 10 हजार रुपयांचा भरभक्कम दंड भरावा लागेल.
जिथे पॅन नंबरच्या ऐवजी आधार नंबर वापरला जातो तिथे इनकम टॅक्स विभागाच्या नियमांनुसार पॅन नंबर देणं अनिवार्य आहे. इनकम टॅक्स रिटर्न्स भरणं, बँकेत खातं उघडणं, डीमॅट अकाउंट उघडणं आणि 50 हजार रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेचे म्युच्युअल फंड्स आणि बाँड्सची खरेदी करण्यासाठी हा नंबर द्यावा लागतो.
आधार कार्डासाठी नवे नियम
आधार कार्ड युनिक आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे दिलं जातं पण दंड हा इनकम टॅक्स विभागातर्फे आकारला जातो. इनकम टॅक्स विभागाचे नियम पाळले नाहीत तर या विभागातर्फे दंड आकारला जातो. याआधी हा दंड केवळ पॅन कार्डापुरता मर्यादित होता. पण पॅन कार्ड आणि आधार कार्डसाठीही हा नियम लागू झालाय.
(हेही वाचा : नोटबंदीची 3 वर्षं : 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची सगळ्यात मोठी बातमी)
यासाठी भरावा लागेल दंड
1. पॅन कार्डच्या ऐवजी चुकीचा आधार नंबर दिला तर
2. जर तुम्ही बँकेच्या व्यवहारांमध्ये पॅन नंबर किंवा आधार नंबर देऊ शकला नाहीत तर
3. नुसता आधार नंबर देणंही पुरेसं नाही तर तुम्हाला बायोमेट्रिक आयडेंटिटी ही सिद्ध करावी लागेल. जर तुम्ही हे पुरावे सादर केले नाहीत तरी दंड भरावा लागेल.
=======================================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा