• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • शेअर सेटलमेंटसाठी आता T+1 सिस्टम लागू होणार; गुंतवणूकदांना काय फायदा होणार?

शेअर सेटलमेंटसाठी आता T+1 सिस्टम लागू होणार; गुंतवणूकदांना काय फायदा होणार?

T+1 मध्ये, T चा अर्थ "ट्रेडिंग डे" आहे. T+1 सिस्टम लागू केल्यामुळे, शेअर्स विकल्यानंतर एका दिवसानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतील. सध्या, शेअर्सच्या सेटलमेंटसाठी T+2 सिस्टम लागू आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 नोव्हेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Share Market Investors) शेअर्स सेटलमेंटचा नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख स्टॉक एक्स्चेंज (Stock Exchanges) आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्युशन्सनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 सिस्टम जाहीर केली. सर्व एक्सचेंजेस आणि इन्स्टिट्युशन्सनी सांगितले की त्यांनी शेअर्सच्या सेटलमेंटच्या (Share Settlement) T+1 सिस्टमसाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम 25 फेब्रुवारी 2022 पासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल. गुंतवणूकदारांना काय फायदा होईल? T+1 मध्ये, T चा अर्थ "ट्रेडिंग डे" आहे. T+1 सिस्टम लागू केल्यामुळे, शेअर्स विकल्यानंतर एका दिवसानंतर गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे जमा होतील. सध्या, शेअर्सच्या सेटलमेंटसाठी T+2 सिस्टम लागू आहे. म्हणजेच शेअर्सची विक्री किंवा ट्रेडिंग केल्यानंतर दोन दिवसांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे येतात. T + 1 सिस्टम लागू केल्यानंतर, गुंतवणूकदारांनी शेअर्स विकल्यास एक दिवस आधी पैसे मिळतील. Multibagger Stock : 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांचे 10,000 चे केले एक कोटी! तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी खालच्या 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये सिस्टम लागू 25 फेब्रुवारीपासून T+1 सिस्टम टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात, बाजार भांडवलानुसार (Market Cap) ही सिस्टम सर्वात कमी 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये लागू होईल. त्यानंतर मार्च 2022 पासून या सिस्टममध्ये आणखी 500 स्टॉक आणले जातील. सर्व मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्सिट्युशन्सनी (MII) एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या MII मध्ये स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज समाविष्ट आहेत. या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक सेबीकडूनही परवानगी बाजार नियामक SEBI ने एक्स्चेंजना 1 जानेवारी 2022 पासून इक्विटी विभागात उपलब्ध असलेल्या कोणत्याही सिक्युरिटीजसह T+1 सिस्टम लागू करण्याची परवानगी दिली होती. संयुक्त निवेदनानुसार, स्टॉक एक्स्चेंज (BSE, NSE आणि MSEI) वरील सर्व सूचीबद्ध शेअर्सना घटत्या मार्केट कॅपनुसार क्रमवारी लावली जाईल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: