स्विस बँकेची 3500 भारतीयांना नोटीस, 7 जणांची नावे जाहीर

स्विस बँकेची 3500 भारतीयांना नोटीस, 7 जणांची नावे जाहीर

स्विस बँकेत पैसे ठेवलेल्या 3500 भारतीयांना नोटिस पाठवण्यात आली असून 7 जणांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जानेवारी : भारत आणि स्वित्झर्लंडच्या आयकर अधिकाऱ्यांनी अशा लोकांची यादी जाहीर केली आहे ज्यांनी करचोरी करून स्विस बँकेत अवैधरित्या पैसे ठेवले आहेत. स्विस बँकेतील अशा खातेधारकांना नोटिस पाठवण्यात आली आहे. स्वित्झर्लंडचे आयकर अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तींची, खात्यांची माहिती भारताच्या आयकर विभागाला दिली आहे. यामध्ये 3 हजार 500 जणांना नोटिस पाठवण्यात आली असून 7 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

स्वित्झर्लंडने सरकारी अधिसूचनेत काही व्यक्तींची नावे जाहीर करण्यात आली  आहेत. त्यांना सांगण्यात आलं आहे की, जर ते भारताला त्यांच्या बँक खात्यांची माहिती सांगण्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्याबाबत एक महिन्याच्या आत नोंदवावा.

स्विस बँकेने ज्या 7 लोकांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये अतुल पुंज, गौतम खेतान, सतीश कालरा, विनोद कुमार खन्ना, दुल्लाभाई कुंवरजी वाघेला, रीवाबेन दुल्लाभाई कुंवरजी वाघेला, बलवंतकुमार दुल्लाभाई वाघेला यांच्या नावांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये नोटिसीत ज्या व्यक्तींची नावे आहेत त्यांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या वारसांना याचे उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.

याशिवाय काही संस्था, ट्रस्टची नावेही देण्यात आली आहेत. यामध्ये द पी देवी चिल्ड्रन्स ट्रस्ट, द पी देवी ट्रस्ट, द दिनोद ट्रस्ट, द अग्रवाल फॅमिली ट्रस्ट यांचा समावेश आहे. तसेच देवी लिमिटेड आणि अधी एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनाही नोटिस पाठवण्यात आली आहे. संस्था, ट्रस्टचा वापर करून काही नेत्यांनी त्यांचा काळा पैसा लपवल्याचा संशय आहे.

वाचा : रुपया गडगडल्याने महागाईत आणखी भर, या गोष्टींना बसणार फटका

काळापैसा लपवण्यासाठी स्विस बँकेची असलेली ओळख पुसण्यासाठी आता स्वित्झर्लंड सरकार पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांत यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यातूनच त्यांनी काही देशांशी करार तडजोडी करताना संशयित व्यक्तिंच्या खात्यांची माहिती संबंधित देशांना देण्यास सुरुवात केली आहे.

वाचा : तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

Published by: Suraj Yadav
First published: January 6, 2020, 7:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading