Home /News /money /

स्विगी 'त्या' डिलिव्हरी बॉयला का शोधतंय? माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

स्विगी 'त्या' डिलिव्हरी बॉयला का शोधतंय? माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

थेट स्विगी कंपनीनेच या तरुणाचा शोध सुरू केला आहे. या तरुणाला (Swiggy searching for Delivery agent on Horse) शोधणाऱ्या व्यक्तीला 5 हजार स्विगी मनी (Swiggy Money) बक्षीस म्हणून मिळणार आहे.

मुंबई, 6 जुलै : काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर एका डिलिव्हरी बॉयचा (Swiggy Delivery agent on Horse) व्हिडिओ व्हायरल झाला होता. याला कारण म्हणजे, स्कूटी, बाईक किंवा सायकलवर नव्हे; तर चक्क घोड्यावर बसून हा स्विगी बॉय मुंबईत फूड डिलिव्हरी (Delivery agent riding Horse) करायला निघाला होता. हा फूड डिलिव्हरी करणारा राजकुमार नेमका कोण आहे? याबाबत नेटिझन्सच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. आता थेट स्विगी कंपनीनेच या तरुणाचा शोध सुरू केला आहे. या तरुणाला (Swiggy searching for Delivery agent on Horse) शोधणाऱ्या व्यक्तीला 5 हजार स्विगी मनी (Swiggy Money) बक्षीस म्हणून मिळणार आहे. स्विगीने आपल्या ट्वीटमधून याबाबत माहिती दिली आहे. “तो घोडा तूफान आहे की बिजली? त्या तरुणाच्या पाठीवर असलेल्या बॅगेत काय आहे? एवढ्या पावसात त्याला मुंबईतील तो रस्ता का ओलांडायचा आहे? ऑर्डर डिलिव्हर करायला गेल्यावर त्याने घोडा कुठे पार्क केला? अरे हा तरुण आहे तरी कोण?” असं स्विगीने आपल्या ट्वीटमध्ये विचारलं आहे. “स्विगी सगळीकडे या तरुणाचा शोध घेत (Swiggy to give reward for finding Delivery agent on Horse) आहे, आणि त्याबाबत माहिती देणाऱ्याला स्विगीकडून 5 हजार स्विगी मनीचं बक्षीस देण्यात येईल.” असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं. बँक ऑफ बडोदाचे चेकसंबंधी नवीन नियम तपासा, अन्यथा चेक क्लिअर होणार नाही या घोडेस्वाराचा व्हिडीओ (Delivery agent on Horse in Mumbai Rain) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. याबाबत कित्येक मीम्सदेखील तयार झाले आहेत. “हाच माझ्या स्वप्नातील राजकुमार, जो घोड्यावर बसून माझ्यासाठी पिझ्झा आणेल,” अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडीओवर दिसत आहेत. स्विगीदेखील यातील बऱ्याच कमेंट्सना रिप्लाय देत आहे. प्रवाशांच्या रेल्वेत विसरलेल्या सामनाचा पुढे काय होतं? तुमचं हरवलेलं सामान परत कसं मिळवायचं? दरम्यान, मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक अजब घटना पाहायला मिळतात. एकीकडे स्विगीचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर ऑर्डर पोचवायला जातो; तर दुसरीकडे उबर लोकांकडून चक्क विमानाच्या तिकिटाहून जास्त रक्कम आकारत आहे. मुंबईतील एका व्यक्तीने एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये अवघ्या 50 किलोमीटरसाठी उबरने चक्क 3000 रुपयांची मागणी केल्याचं दिसत होतं. श्रवणकुमार सुवर्णा असं या व्यक्तीचं नाव आहे. “गोव्याला जायच्या विमानाचं तिकीटही माझ्या उबर राईडपेक्षा स्वस्त आहे” अशा आशयाचं कॅप्शन देत त्याने हा स्क्रीनशॉट शेअर केला होता. या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे, की उबर गो 3,041 रुपयांची मागणी करत आहे, उबर प्रीमियम 4,081 रुपयांची, तर उबर XL 5,159 रुपये दाखवत होतं. हे त्यांचे नेहमीचे दर नसल्याचंही सुवर्णा यांनी सांगितलं. एरव्ही याच मार्गासाठी 800 ते 1000 रुपये आकारले जातात, केवळ पाऊस आहे म्हणून आता दर एवढे वाढवले असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरही ट्विटरवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
First published:

Tags: Food, Money, Swiggy

पुढील बातम्या