Home /News /money /

Lockdown मध्ये नवा व्यवसाय सुरू केलाय? अभिनेता स्वप्नील जोशीला सांगा; वाचा काय आहे त्याची भन्नाट आयडिया

Lockdown मध्ये नवा व्यवसाय सुरू केलाय? अभिनेता स्वप्नील जोशीला सांगा; वाचा काय आहे त्याची भन्नाट आयडिया

लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात तुम्ही नवीन व्यावसाय सुरू केला असेल तर थेट अभिनेता स्वप्नील जोशीला (Swapnil Joshi) त्याविषयी सांगा.

    मुंबई, 09 ऑक्टोबर:  Corona काळात अनेकांची आयुष्यं बदलली. घरून काम करणारे लोक वाढले. Lockdown ने सर्वांनाच घरी बसवलं. रोज घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारं जग शांत झालं. अनलॉक सुरू झाल्यानंतर हळूहळू हॉटेल्स, खानावळी, दुकानं, दळणवळणाची साधनं सगळं काही सुरू होत गेलं. पण या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले तर काही जणांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी नवी उद्योग - व्यावसाय सुरू केले. नव्या व्यावसायांना  प्रमोट करण्यासाठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi)ने एक भन्नाट उपक्रम सुरू केला आहे. ज्या लोकांनी नवीन व्यावसाय किंवा उद्योग सुरू केले आहेत, अशा नवउद्योजकांना चालना देण्याचं काम स्वप्नील जोशी करत आहे. स्वप्नीलने आपल्या Twitter हँडलवर तसं Tweet च केलं आहे. या ट्विटमध्ये स्वप्नीलने म्हटलं आहे, "Lockdown मध्ये कोणी कोणी काय काय नवीन उद्योग/व्यवसाय सुरू केले? कॉमेंट मधे कळवा! Interesting उपक्रमांना SM var प्रोमोट करायचा मानस आहे!" स्वप्नीलच्या या भन्नाट कल्पनेला अनेक उद्योजकांनी प्रतिसाद दिला आहे. स्वप्नीलला अनेक नव्या उद्योजांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या नव्या व्यावसायांबद्दल माहिती दिली आहे. राज्यात अनेक नव्या उद्योजकांनी नवनवीन उद्योग सुरू केले आहेत. स्वप्नील जोशीने सुरू केलेल्या उपक्रमामुळे नव-उद्योजकांच्या व्यावसायांना चालना मिळणार आहे. स्वप्नीलने ट्विट केल्यावर अवघ्या काही तासातच त्याला अनेक उद्योजकांचे मेसेजही आले आहेत. स्वप्नीलनेही अनेक उद्योजकांचे व्यवसायांना प्रमोट करायला सुरुवात केली आहे. सामाजिक जाणिवेचं भान राखत स्वप्नील जोशीने सुरू केलेल्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे. तसंच स्वप्नीलने एखाद्या फिल्मच्या किंवा वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी हा फंडा सुरू केला असल्याचीही चर्चा आहे. कारण काहीही असो पण स्वप्नीलच्या उपक्रमामुळे अनेक व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Lockdown, Swapnil joshi, Twitter

    पुढील बातम्या