20 हजारापेक्षा जास्त TAX REFUND दाव्यांची होतेय चौकशी, दोषींना बसणार मजबूत दंड

20 हजारापेक्षा जास्त TAX REFUND दाव्यांची होतेय चौकशी, दोषींना बसणार मजबूत दंड

इन्कम टॅक्स रिफंडची संख्या जास्त वाढलीय. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ज्या रिटर्नमध्ये शंका वाटते, त्यांची तपासणी करतंय.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी : इन्कम टॅक्स रिफंडची संख्या जास्त वाढलीय. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ज्या रिटर्नमध्ये शंका वाटते, त्यांची तपासणी करतंय. लोकांची कमाई वाढतेय, पण त्यानुसार इन्कम टॅक्स भरला जात नाहीय. उलट रिफंडचे दावे वाढतायत. रिफंडच्या दाव्यात संदिग्धता आढळली की त्याची तपासणी केली जातेय.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री शिवप्रसाद शुक्ला यांनी राज्यसभेत सांगितलं की संदिग्ध टॅक्स रिफंडची संख्या वाढतेय. अशा दाव्यांची तपासणी होतेय. ही संख्या 2018-19 मध्ये20,874,  2017-18 मध्ये 11,059 आणि 2016-17 मध्ये 9,856 राहिलीय.

ते म्हणाले जे दावे खोटे होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना दंड द्यावा लागला.

2018-19 (2 फेब्रुवारी, 2019पर्यंत) Tax Refund ची एकूण रक्कम 1.43 लाख कोटी रुपये, 2017-18 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये, 2016-17 मध्ये 1.62 लाख कोटी रुपये आणि  2015-16 मध्ये 1.22 लाख कोटी रुपये होती.

दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, 2018-19च्या ITRची संख्या 6.36 कोटी होती. 2017-18मध्ये ही संख्या 4.63 कोटी रुपये होती. ती 37 टक्के जास्त आहे.

ते पुढे म्हणाले, 2018-19मध्ये करदात्यांना 25 कोटी SMS आणि ईमेल पाठवले होते. त्यात आयकर रिटर्न भरण्याबद्दल सांगितलं गेलं. ITRबद्दल वर्तमानपत्रात जाहिरात दिली. 2017-18मध्ये ज्यांनी ITR उशिरा भरला त्यांना 10 हजार रुपयेच दंड पडला होता.

जर तुम्ही 2018च्या 31ऑगस्टपर्यंत आयकर भरला नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे 2019च्या 31 मार्चला पुन्हा आयकर भरू शकता. पण तेव्हाही जर तुम्ही आयकर भरला नाही तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा भरण्याची संधी मिळत नाही. तसेच जर तुम्ही दिलेल्या मुदतीत आयकर भरला नाही तर त्या वर्षी व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्हाला मिळत नाही.

VIDEO : मुंबई-पुणे लोकलपुढे 'हे' आहे मोठं आव्हान

First Published: Feb 13, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading