कोरोनामुळे देशाच्या आर्थिक वाढीला जबरदस्त फटका, 62% सीईओंचा पगार कपातीचा निर्णय

कोरोनामुळे देशाच्या आर्थिक वाढीला जबरदस्त फटका, 62% सीईओंचा पगार कपातीचा निर्णय

कंपनीच्या आर्थिक वाढीबद्दल भारतातील 10 पैकी 6 सीईओ साशंक असून त्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थिती कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी पगार कपातीचा मार्ग अवलंबला आहे, असं एका सर्वेक्षणातून लक्षात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. भारतातील सीईओंनी त्यांच्या कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल अदांज बांधायला सुरुवात केली आहे. कंपनीच्या आर्थिक वाढीबद्दल भारतातील 10 पैकी 6 सीईओ साशंक असून त्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थिती कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी पगार कपातीचा मार्ग अवलंबला आहे, असं एका सर्वेक्षणातून लक्षात आलं आहे.

KPMG या संस्थेने ऑगस्ट 2020 मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारलेल्या 100 सीईओंपैकी केवळ एक तृतीयांश सीईओंना त्यांच्या कंपनीची आर्थिक वाढ योग्य होईल असा विश्वास आहे. कोरोनाच्या काळात कंपनी चालवण्यासाठी पगार कपात करण्याचा निर्णय 62 टक्के सीईओंनी घेतला आहे.

वाचा-दसरा-दिवाळीआधी सर्वसामन्यांसाठी आनंदाची बातमी, स्वस्त झाल्या या महागड्या गोष्टी

KPMG चे अध्यक्ष अरुण कुमार म्हणाले, ‘गेल्या सहा महिन्यांत कोरोनामुळे आलेल्या आव्हानांना तोंड देताना चपळता दाखवण्याच्या दृष्टीनी सीईओंच्या प्राधान्यक्रमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात 78 टक्के सीईओंना कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल आत्मविश्वास होता तो आता केवळ 33 टक्के सीईओ व्यक्त करत आहेत. तसंच 84 टक्के सीईओंनी जानेवारीत कंपनीची आर्थिक वाढ होईल असं म्हटलं होतं पण आता हे प्रमाणा 42 टक्क्यांवर आलं आहे. त्यांच्या कमाईच्या दृष्टिकोनाला कोरोनाने आव्हान दिल्याचं स्पष्ट दिसत असून, काहींनी चेन रिस्क, डिजिटल डिसरप्शन ही आव्हानं असल्याचं सांगितलं तसंच सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं.’

वाचा-रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, उपयोगाची आहे LIC ची ही योजना

नव्या तंत्रज्ञानात करणार गुंतवणूक

आयटी क्षेत्रातील कौशल्याची कमतरता ही अडचण ही वाढीत मोठा अडथळा ठरल्याचं अनेक सीईओंनी सांगितलं. या महामारीच्या काळात डिजिटल ट्रान्सफॉर्मेनशमध्ये झालेल्या प्रगतीकडे या सीईओंचं लक्ष असून, त्यामुळे भविष्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टिने 89 टक्के कंपन्या नव्या तंत्रज्ञानामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याला प्राधान्य देणार आहेत अंसही सर्वेक्षणाचं निरीक्षण आहे. जागतिक स्तरावरील सीईओंचा विचार करता भारतातील सीईओंची परिस्थिती चांगली आहे. जगभरातील 23 टक्के सीईओंना वाटतं की त्यांच्या कंपन्यांचा विकास भविष्यात वेगाने होणार नाही किंवा त्यां तोटा होईल. भारतातील केवळ 19 टक्के सीईओंनाच अशी भीती वाटते आहे. जागतिक आणि देशांतर्गत स्तरावरील सीईओ कंपनीची ध्येयं पुन्हा एकदा निश्चित करण्याच्या विचारांत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 2:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या