नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएफवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने पीएफबाबत दिला मोठा निर्णय...

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 02:00 PM IST

नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएफवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पीएफबद्दल मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कंपन्यांना बेसिक सॅलरीपासून स्पेशल अलाउन्स वेगळा करता येणाप नाही.

प्रॉव्हिडंट फंडाच्या कपातीच्या हिशोबात स्पेशल अलाउन्सही जमेत धरावा लागेल. यामुळे कंपन्यांवरील अर्थिक भार वाढणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

बेसिक सॅलरी आणि स्पेशल अलाउन्स 15 हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही.

Loading...

तुमचा पगार 20 हजार असेल आणि त्यात 6 हजार जर बेसिक आणि 12 हजार स्पेशल अलाउन्स मिळत असेल तर तुमचा पीएफ 6 हजार रुपये नाही तर 18 हजार रुपयांवर काढला जाईल. यामुळे तुमच्या पैशांची पीएफमध्ये जास्त गुंतवणूक होईल.

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत विचारण्यात आलं होतं की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जो स्पेशल अलाउन्स देते तो बेसिक सॅलरीमध्ये गृहित धरायचा की नाही? यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

न्यायालयाने म्हटले की, स्पेशल अलाउन्स हा बेसिक सॅलरीचाच एक भाग आहे. छुप्या पद्धतीने अलाउन्स म्हणून दाखवला जातो असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...