चेक पेमेंट करताय? मग ही चूक करू नका, नाही तर जाल तुरुंगात

Check Bounce - कोणालाही चेक देताना ठराविक काळजी घ्यायला हवी

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 12:24 PM IST

चेक पेमेंट करताय? मग ही चूक करू नका, नाही तर जाल तुरुंगात

मुंबई, 31 जुलै : अनेक जण नेहमीच चेकनं पेमेंट करत असतात. पण चेक बाउन्स झाल्यानं लोकांची चिंता वाढते. म्हणूनच सुप्रीम कोर्टानं चेक बाउन्सच्या नियमात बदल केलेत. चेक बाउन्स झाला की त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तक्रारदाराला काही अटी पूर्ण कराव्या लागतीलच.

सुप्रीम कोर्टानं या बाबतीत स्पष्टपणे सांगितलंय की, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम 143A मध्ये 2018मध्ये बदल केलाय. यात तक्रार करणाऱ्याला 20 टक्के अंतरिम नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क असेल. चेक बाउन्स होणं हा गुन्हा आहे. आरोपीला तक्रारदारास अंतरिम नुकसान भरपाई द्यावी लागेल.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'हे' आहेत पेट्रोल-डिझेलचे दर

या परिस्थितीत चेक होतो बाउन्स

तुम्हाला कुणी चेक दिला की तुम्ही तो बँकेत जमा करता. चेक देणाऱ्याच्या खात्यात कमीत कमी चेकवर लिहिलेली रक्कम हवी. तेवढी रक्कम खात्यात नसेल तर बँक चेक dishonour करते. त्यालाच चेक बाउन्स म्हणतात. चेक जेव्हा बाउन्स होतो तेव्हा बँकेकडून एक स्लिप दिली जाते. यावर चेक बाउन्स होण्याचं कारण लिहिलेलं असतं.

Loading...

सोन्याची खरेदी झाली महाग, जाणून घ्या मंगळवारचे दर

20 टक्के रक्कम जमा करण्याचा नियम

चेक बाउन्स झाला तर आरोपीकडून चेकवर लिहिलेल्या रकमेच्या 20 टक्के रक्कम त्याला कोर्टात द्यावी लागेल. खालच्या कोर्टात आरोपीच्या विरोधात निकाल लागला तर तो वरच्या कोर्टात जाऊ शकतो. तेव्हा त्याला एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम कोर्टात जमा करावी लागते.

Paytm सुरू करतेय नवी सेवा, घरबसल्या कमावू शकाल पैसे

चेक कोण देऊ शकतं?

चेक कुठलीही व्यक्ती किंवा कंपनी दऊ शकते. याशिवाय ट्रस्ट आणि सोसायटी, इतर संस्थाही चेक देऊ शकतात.चेक दिल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत तो वैध असतो.

VIDEO: भाजपमध्ये इनकमिंग जोरात, मुख्यमंत्री म्हणतात; 'आम्ही खूप हुशार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: check
First Published: Jul 31, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...