मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर व्याजासह द्यावी लागेल संपूर्ण रक्कम

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर व्याजासह द्यावी लागेल संपूर्ण रक्कम

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 6 जून : घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचा विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Courts big decision) एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नागरिक पैशांची जमावाजमव करुन आपलं हक्काचं घर खरेदी करण्याची स्वप्न पाहत असताना अनेकदा त्यांना बिल्डरकडून अनेक प्रकार त्रासही सहन करावा लागतो. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता बिल्डर घर खरेदी करणाऱ्याला एकतर्फी नियम लादू शकत नाही. ग्राहकाचे हक्क आणि हित लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. न्यायालयाने सांगितलं की, घर खरेदी करणारा एकतर्फी नियम व अटी मान्य करण्यासाठी बांधिल नसेल. ग्राहक संरक्षण अॅक्टअँतर्गत न्यायालयाने अपार्टमेंट बायर्स अॅग्रीमेंटच्या अटी एकतर्फी आणि गैरवाजवी, याशिवाय अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस असल्याचं सांगितलं आहे. वेळेवर डिलिव्हरी केली नाही तर व्याजासह परत द्यावे लागतील पैसे यासोबतच न्यायालयाने सांगितलं की, जर बिल्डरने प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करुन ग्राहकाला दिला नाही तर त्याला घर खरेदी करणाऱ्याला पूर्ण पैसे परत द्यावे लागतील. आणि व्याजही द्यावं लागेल. अशात व्याजाचे पैसे 9 टक्क्यांनी परत द्यावे लागतील. हे ही वाचा-घर खरेदीचा विचार करत असाल तर हे वाचा; सर्वात स्वस्त झालंय Home loan काय आहे प्रकरण? गुरुग्राममधील एका प्रोजेक्टवर सुनावणी देताना कोर्टाने ही टिप्पणी केली आहे. बिल्डरने एक प्रोजेक्ट राष्ट्रीय उपभोक्ता आयोगाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने बिल्डरविरोधात कडक कारवाई केली. हे प्रकरण 1 कोटी 60 लाख रुपयांचे आहे. कोर्टाने सांगितलं की, जर या आदेशाचं पालन करण्यात आलं नाही, तर या प्रकरणात घर खरेदीदाराला संपूर्ण रक्कम 12 टक्के व्याजासह द्यावी लागेल. 2020 या वर्षाच कोरोना व्हायरसची महासाथ असतानाही हा काळ हाऊसिंग सेक्टरसाठी चांगला राहिला आहे. 2020 मध्ये तयार घरांच्या विक्रीचं प्रमाण 9 टक्क्यांनी कमी झालं आहे. जे बिल्डरांसाठी आव्हानात्मक होतं. मात्र गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये नवी घरांच्या विक्रीत मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. हाउसिंग ब्रोकरेज फर्म प्रॉपटाइगर यांनी 'रियल इनसाइट क्यू4 2020' नावाना एक रिपोर्ट जारी केला आहे. यात देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये हाउसिंग मार्केटच्या स्थितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Supreme court, Supreme court decision

पुढील बातम्या