Home /News /money /

मुलीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक! अधिक माहिती जाणून घ्या

मुलीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक! अधिक माहिती जाणून घ्या

सध्याच्या काळात आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची नितांत आवश्यकता आहे. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना (sukanya samriddhi yojana) उत्तम पर्याय आहे.

    मुंबई, 24 जानेवारी : आज 24 जानेवारी हा नॅशनल गर्ल चाइल्ड (National Girl Child Day) म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन आहे. 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. कारण याच दिवशी 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. राष्ट्रीय बालिका दिनाचे उद्दिष्ट मुलींना सक्षम बनवणे आहे. यामध्ये मुलींना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचा उद्देश समाविष्ट आहे. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करायची असेल, तर तुम्ही तिच्या नावावर सुकन्या समृद्धी अकाउंट (sukanya samriddhi yojana) उघडू शकता. मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत उघडता येते खाते सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत (sukanya samriddhi yojana) मुलींचे खाते जन्मापासून ते 10 वर्षे वयापर्यंतच उघडता येते. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. जुळी किंवा तिहेरी मुले जन्माला आल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या वार्षिक 7.6% व्याज मिळत आहे. यामध्ये 250 रुपयांमध्ये खाते उघडता येते. यामध्ये एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यामध्ये खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला देणे आवश्यक आहे. ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही उघडता येते. शेअर बाजारातील पडझडीदरम्यान टॉप पिक्स, या शेअर्समध्ये 3-4 आठवड्यात चांगल्या कमाई 21 व्या वर्षी कालावधी पूर्ण मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर किंवा मुलीचे लग्न झाल्यानंतर खाते मॅच्युअर होईल आणि तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळेल. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च झाल्यास 18 वर्षानंतर सुकन्या समृद्धी योजना खात्यातून 50% पर्यंत रक्कम काढली जाऊ शकते. याशिवाय मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळीही पैसे काढता येतील. 5 वर्षानंतरही खाते बंद करता येते खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी बंद केले जाऊ शकते. हे बऱ्याच परिस्थितींमध्ये देखील केले जाऊ शकते, जसे की एखाद्या धोकादायक आजाराच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही कारणास्तव खाते बंद केले जात असेल तर त्यास परवानगी दिली जाऊ शकते. परंतु, त्यावरील व्याज बचत खात्यानुसार असेल. Gold Silver Price: चांदी 64,500 पार, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर कर सवलतीचा लाभ चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. या अंतर्गत तुम्हाला 1.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Investment, Savings and investments

    पुढील बातम्या