मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सुकन्या समृद्धी की SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, मुलांच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली?

सुकन्या समृद्धी की SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, मुलांच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली?

सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड गुंतवणूक योजना या मुलांसाठी चांगल्या योजना आहेत.

सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड गुंतवणूक योजना या मुलांसाठी चांगल्या योजना आहेत.

सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड गुंतवणूक योजना या मुलांसाठी चांगल्या योजना आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 ऑक्टोबर : आजच्या महागाईच्या जगात मुलांचं शिक्षण आणि लग्नाचा खर्च या दोन्ही गोष्टी खूप महाग होत चालल्या आहेत. उच्च शिक्षणासाठी तर बरीच मोठी रक्कम खर्च करावी लागते. म्हणूनच मुलं मोठी होण्याआधीच त्यांच्यासाठी बऱ्यापैकी बचत आणि गुंतवणूक करण्याचा अनेक पालकांचा प्रयत्न असतो. भविष्यातला ताण कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच पालक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात; मात्र आता छोट्या बचत योजनांवर मिळणारा परतावा इतका कमी झाला आहे, की केवळ त्यावर अवलंबून राहिल्यास उद्दिष्टपूर्ती होणं अवघड होतं.

अर्थतज्ज्ञांचं असं मत असतं, की केवळ भविष्यातलं उद्दिष्ट एवढ्याच उद्देशाने गुंतवणूक करू नये. रिटर्न्स म्हणजेच परतावा चांगला मिळण्यासाठी शहाणपणाने, विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं असतं. सुकन्या समृद्धी योजना आणि एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड या दोन योजनांचे पर्याय त्या दृष्टीने चांगले आहेत. या योजना अधिक कल्याणकारी आहेत. त्या दोन्हींबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. 'मनीकंट्रोल'ने याबद्दल माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

सुकन्या समृद्धी योजना : ही योजना केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून 2015 साली सुरू झाली. त्यानंतर 2019 साली ती सुधारित स्वरूपात सुरू झाली. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस, तसंच बँकांमध्ये खातं उघडता येतं. या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सध्या 7.6 टक्के वार्षिक दराने व्याज दिलं जात आहे. हा व्याजदर वेळोवेळी बदलत असतो. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक या खात्यात करता येते.

वाचा - PPF, NSC खातेदाराने दावा न केलेले पैसे कुठे जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

खातं सुरू केल्यानंतर एखाद्या आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपयेही भरले गेले नाहीत, तर 50 रुपये दंड आकारला जातो. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावे हे खातं उघडता येतं. करसवलतही मिळते. तसंच, या योजनेत मिळणारं व्याजही करमुक्त असतं.

एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड : ही योजना 2002 साली सुरू करण्यात आली. त्यात दोन पर्याय असतात. एक म्हणजे बचत प्लॅन आणि दुसरा म्हणजे गुंतवणूक प्लॅन. मुलांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीकरिता ही योजना सादर करण्यात आली. हा प्लॅन म्हणजे एक कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड आहे. त्यातून डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाते. या योजनेतून सुरुवातीला 10 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळाले आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या फंडने गेल्या एका वर्षात 5.3 टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या तीन वर्षांत 12 टक्क्यांपेक्षा जास्त विकासदर साध्य केला आहे.

कोणत्या योजनेत गुंतवणूक करणं चांगलं?

जे पालक आपल्या मुलग्यांसाठी निधी उभारू इच्छितात, ते सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यामुळे असे पालक एसबीआय मॅग्नम फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफिट फंड गेल्या बऱ्याच काळापासून सुकन्या समृद्धी योजनेच्या तुलनेत अधिक चांगले रिटर्न्स देत आहे. खरं तर, इक्विटी फंड्स दीर्घ काळामध्ये चांगले रिटर्न्स देतात. या दोन्ही योजना चांगल्या आहेत; मात्र तरीही या दोन्हीपैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची, याचा निर्णय प्रत्येक पालकाने आपापल्या परिस्थितीनुसार घेणं श्रेयस्कर ठरेल. त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणं योग्य ठरेल.

First published:

Tags: Investment, SBI