नवी दिल्ली, 29 जुलै: मुलींच्या (Girl Child) जन्माला आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015मध्ये सुकन्या समृद्धी (Sukanya Samriddhi Yojana) नावाची ही एक अल्पबचत योजना (Small Saving Scheme) दाखल केली. इतर अल्पबचत योजनांच्या तुलनेत या योजनेत मिळणारा अधिक परतावा आणि सुरक्षितता या वैशिष्ट्यांमुळे मुलीच्या भविष्यासाठी बचत करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी ही योजना सर्वोत्तम पर्याय आहे. कोणत्याही सरकारी बँकेत (PSU Bank) किंवा पोस्टात (Post Office) याचं खातं उघडता येतं, तसंच ते बँकेतून पोस्टात सहजपणे ट्रान्सफरही करता येतं. प्राप्ती कर बचतीचाही (Tax Benefit) लाभही या योजनेला मिळतो. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये ही योजना लोकप्रिय झाली आहे. या सुकन्या समृद्धी योजनेत महिन्याला तीन हजार रुपये गुंतवल्यास 15 वर्षांच्या मुदतीनंतर 15 लाख रुपये मिळू शकतात.
या योजनेचे नियम :
या योजनेअंतर्गत कोणीही नागरिक आपल्या मुलीच्या नावे सरकारी बँकेत किंवा पोस्टात खातं उघडू शकतो. किमान 250 रुपये भरून हे खातं उघडता येतं. 10 वर्षे वयापर्यंतच्या मुलीच्या नावे हे खातं उघडता येतं. एका कुटुंबात फक्त दोन मुलींच्या नावे खाती उघडता येतात. जुळ्या किंवा तिळी असल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर ती स्वतः हे खातं हाताळू शकते. या योजनेत किमान 15 वर्षे गुंतवणूक करावी लागते. मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत हे खातं सुरू ठेवावं लागतं.
ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांनी बदलणार चेकबुक, ATM ट्रान्झॅक्शनवरील शुल्क
अवघ्या 250 रुपयांनी खातं उघडून या योजनेत गुंतवणूक करता येते. दर वर्षी किमान 250 रुपये भरणं आवश्यक आहे, अन्यथा दंड भरावा लागतो. दरवर्षी किमान रक्कम न भरल्यास खातं बंद होऊ शकतं, मात्र मुदतीआधी केव्हाही दंड भरून ते पुन्हा सुरू करता येतं. यात एका वर्षाला कमाल दीड लाख रुपये भरता येतात.
व्याज आणि करसवलत :
सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत या योजनेचा व्याजदर (Interest Rate) 7.6 टक्क्यांवरच स्थिर ठेवण्यात आला आहे. यातील गुंतवणुकीवर प्राप्तीकराच्या कलम 80 सी (Income Tax 80 C) अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो. खातं उघडल्यापासून 14 वर्षे यात पैसे भरावे लागतात. खातं उघडल्यानंतर 5 वर्षांनी पालकांचा मृत्यू किंवा गंभीर आजार अशी काही अपवादात्मक स्थिती उद्भवल्यास योजना मुदतीपूर्वी बंद करता येते. खातं मुदतीआधी बंद करायचे असल्यास त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.
Mutual Fund: 1000 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा चांगला नफा, 30 जुलैपासून मिळेल संधी
पैसे काढण्याबाबतचे नियम :
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावीपर्यंत तिचं शिक्षण (Education) पूर्ण झाल्यानंतर या खात्यातून पैसे काढता येतात. शिक्षण किंवा लग्न (Marriage) यासाठी मुदतीआधी 50 टक्के रक्कम काढता येते. ही रक्कम एकरकमी किंवा 5 वर्षे हप्त्यानं मिळू शकते.
मुदतीनंतर मिळतील 15 लाख :
या योजनेत दरमहा तीन हजार रुपये गुंतवले तर वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक होईल. 14 वर्षांनी 7.6 टक्के दरानं चक्रवाढ व्याज पद्धतीनं 9 लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. तर 21 वर्षांनी मुदत संपल्यानंतर तब्बल 15 लाख 22 हजार 221 रुपये मिळतील. यात 7.6 टक्के दरानं मिळणारे व्याज करमुक्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Investment, Marriage, Money