• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • अचानक तुमच्या बँक अकाऊंटमध्ये आले कोट्यवधी रुपये... तर हे काम चुकूनही करु नका

अचानक तुमच्या बँक अकाऊंटमध्ये आले कोट्यवधी रुपये... तर हे काम चुकूनही करु नका

तुमच्या अकाउंटमध्ये 1 ते 2 लाख रुपये येऊ शकतात आणि दुसरं म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये येऊ शकतात.

  • Share this:
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये (Bank Account) अचानक भरपूर पैसे जमा झाले, तर तुम्ही काय कराल? 'ते पैसे आम्ही काढून घेऊ,' असं बहुतांश लोकांचं यावर उत्तर असेल. परंतु, थांबा, तुम्ही हे पैसे अकाउंटमधून काढून खर्च केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. या प्रकरणी तुम्हाला पोलीस अटक (Arrest) करू शकतात. आम्ही तुम्हाला हे सर्व का सांगत आहोत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर मागील काही दिवसांत बॅंकेच्या अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याची 3 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी एका प्रकरणातल्या व्यक्तीनं अकाउंटमधून सर्व रक्कम काढली. ज्यानं ही रक्कम काढली त्याचं पुढं काय होणार? ज्यांच्या अकाउंटमध्ये ही मोठी रक्कम जमा आहे, ते ही रक्कम काढू शकतात का? जाणून घेऊ या याविषयी सविस्तर... यात दोन गोष्टी घडू शकतात. एक म्हणजे, तुमच्या अकाउंटमध्ये 1 ते 2 लाख रुपये येऊ शकतात आणि दुसरं म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये येऊ शकतात. या दोन्ही प्रकरणांचा निपटारा करण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. एवढे पैसे कसे जमा होऊ शकतात? एखाद्याच्या बॅंक अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा कसे होऊ शकतात, हा एक वाजवी प्रश्न आहे. या प्रश्नाची दोन उत्तरं असू शकतात. एक म्हणजे चुकून किंवा हेतुपुरस्सर. जेव्हा बॅंकेतले कर्मचारी अकाउंटमध्ये असे पैसे जमा करतात, तेव्हा ती मानवी चूक (Human error) म्हणता येईल. अनेकदा पैसे अशा अकाउंटमध्ये जमा होतात, की ज्याच्याशी संबंधित व्यक्तीचं काही देणं घेणं नसतं. दुसरी बाब म्हणजे एखादी व्यक्ती हेतुपुरस्सर असं करू शकते. बॅंकेतून पैसे ट्रान्सफर (Transfer) करणाऱ्या व्यक्ती अन्य कोणाशी संगनमत करून असं कृत्य करू शकतात. परंतु, बहुतांश प्रकरणांमध्ये असं दिसून येत नाही. कारण जी कोणी व्यक्ती असं करेल तिची नोकरी आणि पैसे दोन्ही जाऊ शकतात.

ITC कंपनीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड! सावध राहा अन्यथा पैसे होतील लंपास

कोट्यवधी रुपये आले तर काय होईल? बिहारच्या (Bihar) कटिहार जिल्ह्यातील आजमनगर ब्लॉकअंतर्गत येणाऱ्या पस्तिया गावातील ही गोष्ट आहे. येथील दोन अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले. त्यात एका अकाउंटमध्ये 6 कोटी तर दुसऱ्या अकाउंटमध्ये तब्बल 905 कोटी. ज्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले ते खातेधारक इयत्ता 6 वीत शिकणारे विद्यार्थी होते. या मुलांच्या अकाउंटमध्ये एवढी मोठी रक्कम जमा झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं. परंतु, उत्सुकता मात्र सर्वांमध्ये होती. त्यानंतर अन्य लोकांनी आपलं अकाउंटदेखील तपासून घेतलं. यासाठी बॅंकेबाहेर भली मोठी रांगही लागली होती. एवढी मोठी रक्कम अकाउंटमध्ये जमा झाल्याची ही पहिलीच घटना होती. हे दोन्ही मुलं किंवा त्यांचे कुटुंबीय ही रक्कम काढू शकतात का? तर नाही. मग या पैशांचं काय होणार?हा पैसा परत कसा जाणार? याबाबत माहिती देताना इंडसइंड बॅंकेचे क्लस्टर हेड सुशीलकुमार बन्सल यांनी सांगितलं, की अशा प्रकरणात बहुतांश वेळा संबंधित बॅंकेची चूक असते. एवढी मोठी रक्कम एकदम अकाउंटमध्ये जमा झाल्यास काय होतं याबाबत बन्सल यांनी सविस्तरपणे सांगितलं.

15 दिवसांनंतर बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरुन वाढून होणार 21000 रुपये! मोदी सरकार करणार बदल

 1 - रक्कम ट्रान्स्फर करणाऱ्याचं आणि रक्कम प्राप्त होणाऱ्याचं अकाउंट एकाच बॅंकेत खातं असेल, तर बॅंक रक्कम प्राप्त होणाऱ्या खातेधारकाचं अकाउंट गोठवते. जोपर्यंत ही रक्कम संबंधित अकाउंटमध्ये सुरक्षित ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत बॅंकेला असं करणं सहज शक्य असतं.
2 - रक्कम ट्रान्सफर करणाऱ्याचं आणि रक्कम प्राप्त होणाऱ्याचं अकाउंट वेगवेगळ्या बॅंकेत असेल तर त्या संबंधित बॅंकेला ज्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत ते अकाउंट होल्ड करण्याची विनंती केली जाते. त्यानंतर बॅंक एका प्रक्रियेच्या माध्यमातून अशा प्रकरणाचा निपटारा करते. 3 - एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटवर मोठी रक्कम जमा झाली असेल, तर ती व्यक्ती ही रक्कम काढू शकत नाही. एखाद्याच्या खात्यावर यापूर्वी कधीच मोठी रक्कम झाली नसेल आणि अचानक ती जमा झाली तर बॅंकेला संबंधित खातेदाराविषयी संशय निर्माण होऊ शकतो. एवढे पैसे तुमच्या खात्यावर कसे, याचा पुरावा बॅंक संबंधित खातेदाराकडे मागू शकते. सबळ पुरावा नसेल तर ती व्यक्ती आपल्या अकाउंटमधून ही रक्कम काढू शकत नाही.

Gold Rates Today: 46000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दर, रेकॉर्ड हायपेक्षा सोनं 10000 रुपयांनी स्वस्त

1 ते 2 लाख रुपये अकाउंटमध्ये आले तर? बिहारमधील खगडिया जिल्ह्यात असंच एक प्रकरण उजेडात आलं. बख्तियारपूर जिल्ह्यातल्या रंजित दास यांच्या अकाउंटमध्ये 1 लाख 60 रुपये अचानक जमा झाले. त्यांनी ही रक्कम काढून खर्चही केली. या प्रकरणात बॅंकेनं काय केलं ते पाहू या... 1 - या ग्राहकानं पैसे काढून घेतल्यानं बॅंकेनं ही रक्कम त्यांना परत जमा करायला सांगितली. परंतु, ग्राहकानं ती खर्च केल्यानं तो रक्कम जमा करू शकला नाही. 2 - पैसे पुन्हा अकाउंटमध्ये जमा होणं अशक्य वाटल्यावर संबंधित बॅंकेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलिस त्या व्यक्तीकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून, याबाबत आता न्यायालय निकाल देणार आहे.

खूशखबर! तुमच्या होम आणि कार लोनवरील EMI होणार कमी, SBI-PNB नंतर या बँकेने घटवले व्याजदर

असं झाल्यास काय करावं? चुकून येणारे पैसे जास्त येऊ देत अगर कमी, हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कायमस्वरूपी राहणार नाहीत, हे नक्की. रक्कम अन्य कोणाची असेल आणि बॅंकेच्या चुकीमुळे ती तुमच्या अकाउंटवर जमा झालेली असेल तरी ती तुम्हाला वापरता येणार नाही. मोठी रक्कम तुमच्या अकाउंटवर जमा झाली, तरी ती तुम्ही कदापि वापरू नये, कारण हे पैसे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत परत करावेच लागतात. त्यामुळे असं झाल्यास तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन बॅंकेला याबाबत माहिती देणं अधिक श्रेयस्कर ठरतं.
Published by:Pooja Vichare
First published: