मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Success Story of Vedantu: यूनिकॉर्न क्लबमध्ये वेदांतूची एंट्री, 10 वर्षांत कंपनी बनली अब्जावधींची

Success Story of Vedantu: यूनिकॉर्न क्लबमध्ये वेदांतूची एंट्री, 10 वर्षांत कंपनी बनली अब्जावधींची

Success Story of Vedantu: वेदांतू भारताच्या युनिकॉर्न क्लबचा (Unicorn club) एक भाग बनली आहे. ज्या स्टार्टअपचं मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असतं, त्यांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये होतो.

Success Story of Vedantu: वेदांतू भारताच्या युनिकॉर्न क्लबचा (Unicorn club) एक भाग बनली आहे. ज्या स्टार्टअपचं मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असतं, त्यांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये होतो.

Success Story of Vedantu: वेदांतू भारताच्या युनिकॉर्न क्लबचा (Unicorn club) एक भाग बनली आहे. ज्या स्टार्टअपचं मूल्य 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असतं, त्यांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये होतो.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: एकीकडे कोरोनानं अनेकांचा रोजगार (Unemployment due to Coronavirus Pandemic) हिरावून घेतला, तर दुसरीकडे काहींनी अशी संधी निर्माण केली की त्यामुळे त्यांचं नशीब उजळलं. अनेक एज्युटेक कंपन्यांची (Edutech Companies) काहीशी अशीच कहाणी आहे. आज आपण चर्चा करणार आहोत 'वेदांतू'ची (Success Story of Vedantu). अर्थात त्याला कारणही तसंच आहे. कंपनीला 'सीरिज-ई'साठी 100 दशलक्ष डॉलर्सचं फंडिंग मिळाल्याची माहिती 29 सप्टेंबर 2021 रोजी 'वेदांतू'नं दिली आहे. आजच्या हिशोबानुसार 100 दशलक्ष डॉलर म्हणजे 7,42,58,10,000 रुपये अर्थात 7 अब्ज 42 कोटी 58 लाख 10 हजार रुपये. त्यामुळे आता

'वेदांतू'ची सुरुवात कशी झाली?

वामसी कृष्णा यांनी 2005 मध्ये मुंबई आयआयटीतून (IIT Mumbai) बी. टेक. पदवी घेतल्यानंतर सौरभ सक्सेना, पुल्कित जैन आणि आनंद प्रकाश या तीन मित्रांच्या सहभागातून 'लक्ष्य'ची (Lakshya) स्थापना केली. ही अॅकॅडमी इंजिनीअरिंग आणि मेडिकल शाखेच्या प्रवेश परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होती. या चौघांनी 10 हजारांहून अधिक विद्यार्थी आणि 200 पेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिलं. 2012 मध्ये एमटी एज्युकेअरने लक्ष्य कंपनी खरेदी करेपर्यंत हे चौघे तिथेच काम करत होते. या चौघांनी 2011 मध्ये 'वेदांतू'ची स्थापना केली. परंतु, 2018 मध्ये सौरभ सक्सेनानं कंपनी सोडली. त्यामुळं उर्वरित तिघं कंपनीचं कामकाज सांभाळत आहेत.

पोस्ट ऑफिस उद्यापासून बदलणार ATM कार्ड आणि ट्रान्झॅक्शन संदर्भातील नियम

कंपनीचं नाव वेदांतू ठेवण्यामागेही एक कारण आहे. हे नाव दोन शब्द एकत्र करून ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी एक शब्द आहे वेद (Ved) आणि दुसरा आहे तंतू (Tantu). वेद याचा अर्थ नॉलेज किंवा ज्ञान आणि तंतूचा अर्थ नेटवर्क. ही ज्ञानाची एक प्रणाली असून, ज्यात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

'वेदांतू'चं वेगळेपण काय?

आपण जे काही शिकतोय ते आपल्याला सोप्या भाषेत शिकवलं गेलं तर, तसंच गरजेवेळी आपल्याला शिक्षकांशी बोलता आलं, त्यांना प्रश्न विचारता आले तर, असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. अर्थात हा विचार केवळ तुमच्याच नाही तर सर्वांच्याच मनात येतो. वेदांतूने नेमकी हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आपल्याशी जोडला गेलेला प्रत्येक विद्यार्थी त्याला वाटेल तेव्हा त्याच्या शिक्षकांशी संवाद साधू शकेल, अशी रचना वेदांतूनं केली. त्यांनी प्रत्येक वर्गाला परस्परसंवादी आणि मनोरंजक बनवलं.

Flipkart Big Billion Days मध्ये मोबाइल, लॅपटॉप, कपड्यांवर मिळेल 80% पर्यंत सूट

येथील प्रत्येक विद्यार्थी काळाच्या गतीनुसार चालतो, हे याचं वैशिष्ट्य. ज्या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या गोष्टी पटकन आकलन होतात, ते पुढं निघून जातात आणि ज्या विद्यार्थ्यांना पटकन समजत नाहीत ते मागेच राहतात, असं इथे होत नाही. आकलन शक्ती आणि वेग यांची सांगड घालत विद्यार्थी पुढे जातात. येथे सर्व लेक्चर्स रेकॉर्ड होतात, त्यामुळे ती पुन्हा पाहता येतात. एखाद्या विद्यार्थ्याच्या परिसरात इंटरनेट स्पीड चांगला नसेल तरी त्यांचे व्हिडिओ क्लासेस सुरळीत चालू शकतात, असा दावा वेदांतूनं केला आहे.

लोकांना आवडतंय वेदांतू मॉडेल

वेदांतूची शिक्षण देण्याची पद्धत विद्यार्थ्यांना आवडत आहे, यात कोणतीच शंका नाही. त्यामुळे दरमहा 35 दशलक्ष युझर्स हे फ्री अॅप (Download Vedantu App) आणि वेबसाइटचा वापर करतात. यू-ट्यूब चॅनेलवर (Vedantu on Youtube) त्यांचे 65 दशलक्ष व्ह्यूज असून, ते दररोज वाढतच आहेत. देशातल्या कोणत्याही के-12 एज्युकेशन कंपनीच्या तुलनेत हा प्रतिसाद सर्वोत्तम असल्याचा दावा वेदांतूनं केला आहे. गेल्या वर्षी कंपनीनं 2 लाखांहून अधिक फी भरून शालेय विद्यार्थ्यांना शिकवलं. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 300 टक्के अधिक होतं. वेदांतु, प्रत्येक विद्यार्थ्याचं बारीक निरीक्षण करतं. यासाठी वेळोवेळी परीक्षा घेतल्या जातात आणि कॉम्प्रीहेन्सिव अॅनालिसिस केलं जातं. यामुळं अभ्यास नेमका किती झाला आहे, हे विद्यार्थी आणि पालकांना समजतं.

First published:

Tags: IIT, Success, Success story