मराठी बातम्या /बातम्या /मनी /नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभा करताच पालटलं नशीब, थेट उद्योग विभागाने दिली मदत!

नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उभा करताच पालटलं नशीब, थेट उद्योग विभागाने दिली मदत!

तरुणाला उद्योग विभागाकडून मिळाली मदत

तरुणाला उद्योग विभागाकडून मिळाली मदत

बेगुसरायमधील 26 वर्षांचा तरूण सुजित कुमारने मोहरीचे तेल तयार केलं आणि नंतर केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील उद्योग विभाग युवकांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी सतत प्रेरित करत आहे. युवक स्वतःचा रोजगार निर्माण करून स्वावलंबी व्हावेत यासाठी त्यांना या विभागाकडून आर्थिक मदतही केली जात आहे. उद्योग विभागाच्या या उपक्रमाचा लाभ प्रत्येक वर्गाला मिळत आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये काम करणाऱ्यांनी उद्योग विभागाच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि ते आजूबाजूच्या भागातील लोकांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करत आहेत. बेगुसरायमधील 26 वर्षांचा तरूण सुजित कुमारने मोहरीचे तेल तयार केलं आणि नंतर केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली आहे. या व्यवसायातून त्याला चांगला नफा मिळत आहे तसेच तो स्थानिक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध करून देत आहे. या व्यवसायातून सुजित कुमारने आत्तापर्यंत सात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सुजित कुमारने स्वयंरोजगारासाठी उचलेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

  छोट्या उद्योगातून सुचली कल्पना

  बेगुसराय जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या दंडारी या छोट्या गावातील रहिवासी सुजित कुमारने सांगितले की, ``मी या पूर्वी राजस्थानमधील टायर बनवणाऱ्या कंपनीत 8 हजार रुपये पगारावर काम करत होतो. त्या दरम्यान मला बिहार सरकार उद्योग विभागाच्या माध्यमातून छोटे उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी मदत करत असल्याची माहिती मिळाली. या साठी सरकार कर्जदेखील देत असून, लोक या माध्यामातून स्वतःचा व्यवसाय सुरू करत असल्याचे समजले. मग मी राजस्थानमधील टायर निर्मितीचं काम सोडून गावी परतलो. त्यानंतर जिल्हा उद्योग विभागाच्या कार्यालयात जाऊन व्यवसाय सुरू करण्यासंबंधीची सर्व प्रक्रिया समजून घेत कर्जासाठी अर्ज केला.``

  10 लाखांचं कर्ज घेऊन सुरू केला उद्योग

  सुजित कुमारने सांगितलं, ``मी उद्योग विभागाकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी एससी-एसटी प्रवर्गासाठीच्या योजनांतून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले. यानंतर मोहरीच्या तेलाबरोबरच भांडी, शौचालयासह विविध गोष्टी स्वच्छ करण्यासाठी लागणारे रसायन बनवण्यास सुरूवात केली. घरातच या गोष्टींचे उत्पादन आणि पॅकेजिंग सुरू केले आणि परिसरात त्याची विक्री सुरू केली. आज मी यातून सात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या महिलांना पाच ते नऊ हजार रुपयांदरम्यान पगार देतो. दर महिन्याला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत विक्री होते. बचतीबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती 15 हजारांच्या आसपास आहे, ``असं सुजित कुमारने सांगितलं. सुजित कुमारच्या प्रयत्नांमुळे इतरांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Business, Business News